pub-7425537887339079
ब्रेकिंग

घनसावंगी आणि अंबड येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय म्हैस पालन प्रशिक्षणाचे आयोजन

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.3

घनसावंगी आणि अंबड येथे पशुसंवर्धनावर आधारित।जालना द्वारे घनसावंगी आणि अंबड येथे आणि अंबड येथे 5 दिवसीय कालावधीचे ” पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) जालना जिल्हा द्वारे घनसावंगी कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय / म्हैसपालन” प्रशिक्षण कार्यक्रम” दि.16 जुन ते 19 जुन2026 या कालवधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजागार युवक-युवती व महिलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करावा असा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजना मागचा मुख्य उद्देश आहे. सदर प्रशिक्षणामधून प्रशिक्षणार्थीना स्वयंरोजगाराबाबत उपलब्ध बंदीस्त शेळीपालनः-शेळीपालनाची सद्य स्थिती शेळ्यांच्या विविध जाती निवड आदर्श गोठा शेळ्याचे प्रमुख आजार व लक्षणे प्रतिबंधक उपाय व उपचार शेळ्याचे संतुलित आहार, गाभण शेळ्याचे व करड्याचे संगोपन इ. सखोल मार्गदर्शन या शिवाय उद्योजकता प्रशिक्षण :- ज्यामध्ये उद्योजकीय प्रेरणा व गुणसंपदा, कौशल्य विकास व स्वयं मुल्यांकन (मी कोण आहे) उद्योग उभारणी विवध टप्पे, आपल्या कामासाठी कुठे संपर्क करावा, उद्योग व्यवसायाची निवड, उद्योग संधी, उद्योग व्यवस्थापन, बाजार पेठ व्यवस्थापन, मार्केटिंग व संभाषण कौशल्य, विविध कार्यालय व महामंडळांच्या कर्ज विषयक माहिती, राष्ट्रीय कृत बँका नाबार्ड, यांचे कार्य व योजनांविषयी माहिती लघु उद्योग नोंदणी कर्ज व सादरीकरण व प्रक्रिया, उद्योग संदर्भात कायदे, शासकीय कर्ज योजनांची माहिती व सवलती इ.बाबत तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी हा किमान 7 वी पास व 18 ते 50 वयोगटातील असावा तसेच स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा असावी. तरी इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी दि.15 जुन 2026 पूर्वी कैलास भाबट, कार्यक्रम समन्वयक, मो. 7498398483 , 96896783942 जालना किंवा प्रकल्प अधिकारी विनोद तुपे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482 -220592 येथे संपर्क करावा. असे आवाहन विभागीय अधिकारी, एस के थोटे, अएमसीईडी छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे