राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल मध्ये संविधान दिन साजरा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26
येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात विविध शैक्षणिक व प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून झाली. शाळेचे प्राचार्य व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची मूल्ये, मूलभूत हक्क आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित भाषणे सादर केली, संविधानाचा सन्मान राखणे आणि लोकशाही मूल्ये जपणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


