pub-7425537887339079
ब्रेकिंग

७२ ग्रामपंचायतींचे १३९ कर्मचारी पाच महिन्यांपासुन वेतनाविना उपासमारी वेळ जाफाबाद पंचायत समिती गटविकास अधिकारी पद रिक्त

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि 16

जाफाबाद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७२ ग्रामपंचायतमधील शिपाई पाणीपुरवठा कर्मचारी आणि लिपिक अशा १३९ कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यापासून वेतन रखडले आहे जानेवारी २०२६ पासून या कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नसल्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप पंडीत यांनी दिली जाफराबाद पंचायत समितीमध्ये ३० एप्रिल महिन्यापासून गटविकास अधिकारी पद रिक्त आहे त्यामुळे प्रशासकीय कामाकाजावर मोठा परिणाम झाला असुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित आवश्यक मंजुरी स्वाक्षऱ्या आणि आर्थिक प्रस्तावांची प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन लांबणीवर पडले आहे प्रशासनातील या दिरंगाईचा थेट फटका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना बसत आहे सलग पाच महिने पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे वर खर्च भागवण्यासाठी अनेकांना कर्ज काढावे लागता असुन किराणा दुकानातील उधारी वाढली आहे मुलांची शैक्षणिक फी औषधी उपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करतात कर्मचाऱ्यांची मोठी ओढाताण होत असुन त्यांच्यावर आता मारायची वेळ आली आहे आर्थिक विवंचनेमुळे अनेक कर्मवीरांचा मानसिक तणाव वाढल्याचे ही समोर आले आहे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सेवा मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र त्यांना वेतनासाठी महिना महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेत गटविकास अधिकारी यांचा अतिरिक्त प्रभार सोपवुन रखडलेले वेतन त्वरित विचारीत करावे अशी मागणी ग्रामपंचायत युनियन कर्मचाऱ्या संघनेच्या वतीने करण्यात आले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे