pub-7425537887339079
ब्रेकिंग

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ जालना

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.4

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025-26 स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर, 2025 पर्यंत वाढविण्यात आली होती. तसेच Send Back केलेल्या अर्जाबाबत पाठपुरावा करुन विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची पुर्तता करुन घेणे आवश्यक होते. सदर विद्यार्थ्यांना 5 मे, 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत देण्यात येत आहे. विहीत मुदतीत त्रुटी पुर्ण करून कागदपत्रांची पुर्तता केली नाही तर पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यास अर्ज करता येणार नाही व तो स्वाधार योजनेपासून वंचित राहिल. अर्ज फेर सादर न केल्यास अर्ज अपात्र/बाद ठरतील. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे शासकीय निवासी शाळा जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे