pub-7425537887339079
ब्रेकिंग

“भारतीय जनता पार्टी – उत्तर रायगड जिल्हा प्रशिक्षण वर्ग २०२६ संपन्न.

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि,17
दि. १६ व १७ मे २०२६ रोजी आयोजित उत्तर रायगड जिल्हा प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांना संघटन कौशल्य, विचारधारा, सोशल मीडिया, कार्यपद्धती, इतिहास, विकास, राजकीय व सामाजिक भान तसेच कार्यकर्ता विकास यांसारख्या विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
या प्रशिक्षण वर्गास  आमदार महेश बालदी यांचे विशेष सहकार्य व शुभेच्छा लाभले.अविनाश कोळी  जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी रायगड यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण वर्गाचे प्रभावी आयोजन करण्यात आले. निरंजन डावखरे (प्रदेश सरचिटणीस), आमदार प्रशांत ठाकूर (प्रदेश चिटणीस), माधव भंडारी  मुख्य प्रवक्ते, भाजपा महाराष्ट्र,केशव उपाध्ये प्रदेश उपाध्यक्ष, गणेश हाकेकर प्रवक्ते, भाजपा महाराष्ट्र, भारत आदमपुरे विवेक विचार मंच,मकरंद मुळे पत्रकार,समीर गुरव आयटी संयोजक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश, नरेंद्र पवार माजी आमदार तथा प्रदेश संयोजक, भटके विमुक्त आघाडी,
तसेच इतर मान्यवरांनी आपल्या प्रभावी विचारांतून कार्यकर्त्यांना नवी दिशा आणि प्रेरणा दिली.
या प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक स्पष्टता, संघटनात्मक शिस्त, समाजसेवेची जाणीव आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा निर्माण झाली.
“राष्ट्र प्रथम, संघटन सर्वोच्च, समाजसेवा हाच संकल्प”
या विचाराने प्रेरित होत या प्रशिक्षणात प्रत्येक कार्यकर्ता अधिक सक्षम, सजग आणि कटिबद्ध बनला.अशा प्रकारे सदर प्रशिक्षण वर्ग मोठया उत्साहात संपन्न झाले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे