pub-7425537887339079
ब्रेकिंग

दुष्काळात वन्यजीवांसाठी सरपंच सवडे यांची माणुसकीचा झरा सर्वत्र कौतुक

0 5 3 7 3 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14

जाफराबाद : एकीकडे माणसांनाच पाण्यासाठी

संघर्ष करावा लागत असताना, दुसरीकडे जंगलातील मुक्या जीवांची तहान कोण भागवणार? हा संवेदनशील प्रश्न लक्षात घेऊन नांदखेडा, किन्ही व कचनेरा या गट ग्रामपंचायतीचे सरपंच बाबासाहेब सवडे यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी स्वखर्चातून पाणवठा तयार केला असून, टँकरद्वारे त्यात नियमित पाणी टाकण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

जाफ्राबाद तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. उन्हाच्या तीव्रतेसोबतच जलसाठ्यांनी तळ गाठल्याने नदी, नाले, तलाव आणि नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. परिणामी, जंगल

परिसरातील वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. पाण्याअभावी वन्यजीवांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असताना सरपंच बाबासाहेब सवडे यांनी पुढाकार घेत वन्यजीवांसाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे. स्वतःच्या खिशातून खर्च करून पाणवठा तयार करणे आणि त्यात टँकरने नियमित पाणी उपलब्ध करून देणे, ही बाब केवळ सामाजिक उपक्रम नसून निसर्गाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी आहे. मुक्या प्राण्यांची तहान
—————————————————————-
“दुष्काळामुळे केवळ माणसांनाच नव्हे, तर जंगलातील मुक्या प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्राण्यांना बोलून आपली तहान सांगता येत नाही. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन मी स्वखर्चातून पाणवठा तयार केला आहे. वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी टँकरद्वारे नियमित पाणी टाकण्याची व्यवस्था केली आहे. मुक्या जीवांची तहान भागविणे ही आपलीही जबाबदारी आहे. शक्य होईल तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.”

– बाबासाहेब सवडे, सरपंच
__________________
भागविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सवडे यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 3 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे