स्त्री शक्ती फाउंडेशन आयोजित “शाडुच्या मातीपासुन’ गणेशमुर्ती ‘बनविणे कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.2
पुणे — स्त्री शक्ती फाउंडेशन ,पुणे संचलित महिला विकास समितीच्या सहकर्याने ‘अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र आयोजित ‘शाडुच्या मातीपासुन (इको फ्रेंडली )गणेशमुर्ती बनविण्याच्या एक दिवशीय आॕनलाइन कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी लहान मुलांसाठी आॕनलाइन शिबीर ,कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चनाताई सोनार यांनी ‘शाडुच्या मातीपासुन गणेशमुर्ती बनविण्यासाठी निःशुल्क आॕनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले होते.प्रमुख अतिथी म्हणुन रुग्वेद सुवर्णवार्ता प्रसार वाहिनीचे संपादक दिनेशजी येवले,अध्यात्मज्ञान प्रसारक व पत्रकार आत्माराम ढेकळे तसेच मार्गदर्शक म्हणून योगशिक्षक व विविध पुरस्कार प्राप्त उत्तमराव वडगावकर ,महाराष्ट्र सुवर्णकार वर-वधु समुहाच्या महिला अध्यक्षा श्रीमती माला प्रमोद ढोमणे हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रामुख्याने प्रशिक्षक म्हणून सार्थक कर्णे व समर्थ कर्णे यांनी अत्यंत कुशलतेने सहभागी लहान मुला -मुलींना शाडुच्या मातीची कृती सांगुन प्रात्यक्षिक करुन दाखविले.व सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी त्यानुसार शाडुच्या मातीपासुन गणपती कसे तयार करावेत याबाबत मार्गदर्शन केले.व सहभागी मुलांनी हुबेहुब गणपती तयार केले. गणेशमुर्ती वाळल्यानंतर त्यांना रंग कसे द्यायचे ,घरगुती साहित्य वापरुन लेस,स्टोन,मणी अशा वस्तुंचा वापर करुन सजावट कशी करायची हे खुप छान सोप्या पध्दतीने त्यांनी शिकविले.साधारण सोळा वर्षाखालील मुलांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला या आॕनलाइन कार्शाळेत मुलांच्या पालकांनी देखील आनदाने सहभाग घेऊन गणबत्ती बाप्पा बनविले.अध्यात्मिक बालसंस्कार केंद्राच्या वतीने मुलांवर चांगले संस्कार देण्याचे कार्य करीत असतांना त्यांना इको फ्रेंडली गणपती बनविण्याची सवय आम्ही लावतो.म्हणजे प्रदुषण कसे टाळता येईल.व मुलांना अध्यात्मिक गोडी कशी निर्माण करता येईल .हा उद्देश या कार्यशाळेचा असल्याचे संयोजिका योगगुरु अर्चनाताई सोनार यांनी प्रारंभी प्रास्ताविकात प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी व मार्गदर्शक यांनीही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.लहान मुलांना या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ मिळाले.व त्यामुळे त्यांचे कलागुण पाहण्यास मिळाले.व त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास होण्यास वाव मिळतो. इतक्या लहान वयात सुंदर कला कौशल्य सादर करणे म्हणजे त्यांना ‘देवाची देणगी’च आहे. या लहान मुलांना चांगले संस्कार ,आत्मविकास व त्यांचेतील चांगले गुण विकसित करणेसाठी हा उपक्रम निश्चितच कौतुकास्तुभ आहे. मुलांचे खुप कौतुक आहे.त्यांच्या कलेचे सादरीकरणाचे अर्चनाताई मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित करतात.ही अभिनंदनपर बाब आहे.असे आपल्या मनोगतातुन उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यशाळेत विविध प्रदेशातील मुलांनी सहभागी होऊन प्रतिसाद दिला शेवटी संयोजिका अर्चनाताई सोनार यांनी आभारप्रदर्शन केले.



