pub-7425537887339079
ब्रेकिंग

 दिवाळीच्या आनंदासोबत विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन; खानापूर शाळेत शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप

0 5 2 0 1 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5

खानापूर येथील प्राथमिक शाळेत दिवाळी सणाचे औचित्य साधून शालेय समितीचे अध्यक्ष संदीप पाटील शेळके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.
दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांचा अभ्यास नियमित सुरू राहावा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाच्या दोन रेघी व चार रेघी वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दिवाळीचा सण विद्यार्थ्यांनी आनंदाने व गोडवा जपत साजरा करावा, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सोनपापडीचे एक पाकीट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आनंदाची आणि गरजांची जाणीव ठेवून राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी शालेय समितीचे माजी अध्यक्ष विश्वास शेळके, मारोती शेळके, योगेश शेळके, अंगणवाडी सेविका कल्याणी डोके, अंगणवाडी मदतनीस नीता हिवरे, शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण गीते व सहशिक्षिका शारदा कायंदे यांची उपस्थिती होती.
**विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदतीचा हात आणि दिवाळीच्या आनंदात गोडव्याची भर घालणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.**

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 1 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे