pub-7425537887339079
ब्रेकिंग

देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफी योजना फसवी – मयूर बोर्डे यांचा आरोप

0 4 8 4 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची योजना आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी मोठ्या प्रमाणावर फसवी आहे. सन 2017-18 पासून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केलेली पन्नास हजार ऐवजी दोन लाख रुपयांची प्रोत्साहन योजना देखील मिळालेली पाहिजे त्यामुळे विविध सेवा सहकारी सोसायट्यांच्या चेअरमन यानी योजनेची सरकारने तात्काळ लागू करावे अशी एकमुखी मागणी केली आहे, असे चेअरमन जानकिराम अंभोरे डोणगाव यांनी म्हटले आहे.

नुकतीच कर्जमाफीची यादी जाहीर झाली असून यामध्ये गावातून केवळ एक-दोन शेतकऱ्यांचीच नावे आली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ घालण्यात आला आहे. सरकारने सरसकट माफी देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री वेगळेच चित्र दिसत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

सन 2009 पासून अनेक शेतकरी थकबाकीदार आहेत, त्यांनाही माफी देण्यात येईल असे फक्त सरकार घोषणा देत आहे. प्रत्यक्षात कोणालाच लाभ मिळत नाही. त्यामुळे नियमितपणे कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांची प्रोत्साहन योजना तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी मयूर बोर्डे यांनी केली आहे.

या फसव्या कर्जमाफी विरोधात लवकरच सरकारविरोधात जनआंदोलन उभे करून लढा देण्याची तयारी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

कोटः सरकारने कर्ज माफी सरसकट देऊ असे आश्वासन आ रोहित पवार यांना दिलेल्या होती परंतु अद्यापही योजना कागदावर दिसत आहे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार ऐवजी दोन लाख रुपये द्यावी आम्ही काय नियमित भरणाऱ्या शेतकरी यांनी का पाप केलं का असे शेतकरी सोसायटीच्या कार्यालयात येऊन बोंब मारत आहे…रावसाहेब पाटील अंभोरे चेअरमन

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 4 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे