pub-7425537887339079
ब्रेकिंग

भोकरदनच्या इतिहासात पहिल्यांदा – गुत्तेदारांना सार्वजनीक बांधकाम विभागाची नोटीस – बोरशे गुरुजीं

0 4 5 1 2 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.27

आमदार-खासदार जवळच्या राजुरेश्वर व करेज कंपनीला लेखी दणका – उपोषणामुळे सा. बां. विभाग झुकला* करजगांव, भोकरदन: भोकरदन तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी पुढाऱ्यांच्या पाठबळावर असलेल्या काही प्रतिष्ठित गुत्तेदार कंपन्या आहेत. राजुरेश्वर इंफ्रास्ट्रक्चर असो किंवा करेज इंफ्रा. असो, या आमदार-खासदार जवळच्या कंपन्यांच तालुक्यातील कामे करतात.अर्धवट सोडतात. रस्त्याच्या कामावर कोणी बोट ठेवायची हिंमत करत नव्हता. काम न करता देखील लाखो रुपये उचलले जात होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहत होते. आताही ही कामे अर्धवट सोडण्याचा डाव बोरशे गुरुजींच्या उपोषणामुळे फसला. बोरशे गुरुजींनी दि. 01/07/2026 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.परिणाम तात्काळ झाला. भोकरदनच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाला या सत्ताधारी कंपन्यांना लेखी नोटीस काढावी लागली. उपविभागीय अभियंता यांनी राजुरेश्वर इंफ्रास्ट्रक्चर असो किंवा करेज इंफ्रा. या दोन्ही कंपन्यांना अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा अशी लेखी नोटीस बजावली. दि. 26/06/2026 रोजी दुपारी 2 वाजता उपविभागीय अभियंता हे बोरशे गुरुजींसह सुरंगळी ते जळगाव सपकाळ व करजगाव ते कल्याणी-कुकडी या दोन्ही रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करायला आले. पाहणी दरम्यान सर्व सूचना त्यांनी मान्य केल्या आणि लेखी आश्वासन देण्याचे कबुल केले. सत्ताधाऱ्यांच्या कंपनीला नोटीस हा प्रकार भोकरदन तालुक्यात पहिल्यांदा घडला आहे. पैशाच्या जोरावर आणि राजकीय दबावावर चालणाऱ्या व्यवस्थेला बोरशे गुरुजींच्या उपोषणाने हादरा दिला आहे. 15 दिवसात काम सुरू न झाल्यास बेमुदत उपोषण अटळ आहे. आता झुकणारी फक्त जनता नाही, आता व्यवस्था झुकेल. असे बोरशे गुरुजी म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 1 2 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे