अखिल भारतीय लोकहित महासंघाच्या जालना तालुका सहसचिवपदी गणेश कातकाडे यांची नियुक्ती

जालना/प्रतिनीधी,दि.3
लोकांच्या हितासाठी सदैव तत्पर असणार्या अखिल भारतीय लोकहित महासंघाच्या जालना तालुका सहसचिवपदी कडवंची येथील युवा समाजसेवक गणेश कातकाडे यांची नियुक्ती नुकतीच महासंघाचे अध्यक्ष शेख चाँद पी.जे. यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे, यावेळी महासंघाचे जालना शहर सहसचिव ईम्रान खान यांची विशेष उपस्थिती हेाती. समाजातील तळागळातील वंचीत, वृद्ध, युवक, महिला, विद्यार्थी, कामगार या सर्वाच्या हितासाठी सर्वातपरी प्रयत्न करावे असे आवाहन नियुक्ती पत्रामध्ये करण्यात आलेले आहे. सदर नियुक्ती बद्दल गणेश कातकाडे यांचे महासंघाचे कार्याध्यक्ष वसीम खान, जिल्हाध्यक्ष प्रदिप दिव्यवीर तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. —————————– प्रति, मा. संपादक/जिल्हा प्रतिनीधी साहेब, कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशीत करून सहकार्य करावे हि नम्र विनंती आपला शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366



