pub-7425537887339079
ब्रेकिंग

गेट बंद आंदोलनाला यश! मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य; सर्व सहकार्यकर्त्यांचे मानले आभार

मास्टर मरीन सर्व्हिसेसकडून १० स्थानिक कामगारांना रोजगार; उर्वरित ९ कामगारांना डिसेंबरमध्ये घेणार.

0 5 2 7 5 4
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, या प्रमुख मागणीसाठी मास्टर मरीन मेहर यार्ड, खोपटे येथे मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गेट बंद आंदोलनाला अखेर यश आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झालेले हे आंदोलन ३१ ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाले. कंपनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मास्टर मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी ५ नोव्हेंबर रोजी १० स्थानिक कामगारांना लोकल लेबर म्हणून कामावर घेतले असून, उर्वरित ९ कामगारांना डिसेंबर महिन्यात कामावर घेण्यात येणार आहे.
स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेने आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन उभारले होते. आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका संघटक बी. एन. डाकी तसेच भाजप उरण ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस प्रशांत रमेश ठाकूर यांचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.
या आंदोलनाला शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, सुधाकर पाटील, एल. बी. पाटील, कोमसापचे प्रतिनिधी, शेकाप तालुका सरचिटणीस रवी घरत, रुपेश पाटील, पंचायत समिती सदस्य कविता पाटील व दीपक भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, मनसे तालुकाप्रमुख सत्यवान भगत, ग्रामपंचायत सदस्य अविनाश ठाकूर, विश्वनाथ पाटील, ॲड. आशिष घरात, ॲड. धनेश्वर ठाकूर, महेंद्र पाटील, राजन पाटील, किरण म्हात्रे, वैभव ठाकूर, पराग ठाकूर, पत्रकार अजित पाटील, पत्रकार विठ्ठल ममताबादे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
आंदोलन शांततेत पार पडण्यासाठी उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, एसीपी पै. विजय चौधरी, पोलीस प्रशासन आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. माजी सरपंच प्रिती पाटील, विशाखा ठाकूर, माजी उपसरपंच अशोक भगत, सुजित म्हात्रे, रितेश ठाकूर, खोपटे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष अलंकार पाटील, सचिव कुमार ठाकूर, खजिनदार व सर्व पदाधिकारी, राजेंद्र म्हात्रे, सात पाड्यांतील अध्यक्ष व पदाधिकारी, बांधपाडा अध्यक्ष भालचंद्र पाटील, त्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आंदोलनाला भक्कम पाठिंबा दिला.
विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. बी. एन. डाकी, अतुल ठाकूर, प्रशांत ठाकूर, चंद्रहास ठाकूर, संचित डाकी, महेश पाटील, पांडुरंग ठाकूर आणि धर्मेंद्र ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभले. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, ग्रामस्थ, संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या सर्वांनी आंदोलनाला बळ दिले.
स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकजुटीने साथ देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, शेतकरी बांधव आणि हितचिंतकांचे मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने मनःपूर्वक आभार मानले आहेत. स्थानिकांच्या एकजुटीमुळे आणि संघटित लढ्यामुळे रोजगाराच्या मागणीला यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
 प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या मागणी नुसार सर्वेअर , सफाई, लागणारे इतर कामगार.कामगार,साधनसामग्री, ठेकेदारी, या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुन्हा एकदा गेट बंद आंदोलन करण्यात येईल याची कंपनी व्यवस्थापनाने नोंद घेवून दिलेल्या मागणी पत्रकात नमूद केलेल्या विषय चर्चेला बसुन निकाली काढाव्यात अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी मास्टर मरिन्स कंपनीची राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 7 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे