pub-7425537887339079
ब्रेकिंग

साई ट्रस्ट ज. ने. पोर्ट विद्यालयाचा  कु. नमित प्रदीप वाघावले राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा तर उरण तालुक्यातून पहिला

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12
साई ट्रस्ट ज ने पोर्ट विद्यालय शेवा प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाचा हुशार, मेहनती आणि गुणी विद्यार्थी कु. नमित प्रदीप वाघावले याने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९८पैकी २४० गुण मिळवून रायगड जिल्हा राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा आणि शाळेतून व उरण तालुक्यातून १ ला येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याला वर्ग शिक्षिका श्रीम. वंदना कपूर, श्रीम. सारिका तायडे, श्रीम. योगसाधना पाटील, श्रीम. सचिता वाघावले या मेहनती शिक्षिकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच कु. नमित याचे पालक यांनी सुध्दा खूप मेहनत घेतली. कु. नमित वाघावले याने शाळेचे नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यात उंचावले आहे. तसेच शाळेचे ७ हुशार व मेहनती विद्यार्थी उत्तीर्ण (पात्र )झाले आहेत.त्याच्या या
उज्ज्वल यशाबद्दल साई ट्रस्ट चे अध्यक्ष नरसू पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड, गिरीश पाटील,भुषण जाधव,  अंकुश जोगळे, श्रीम. वैशाली बोरचटे, ज्येष्ठ कलाशिक्षक मिलिंद ठाकूर, श्रीम. सुमन पाटील, श्रीम. भारती कांबळे, पंडित गणेश बंडा, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ आणि पालक संघर्ष समिती पदाधिकारी आणि तमाम पालक वर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे.त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे