pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णीच्या डॉ. अनिकेत बोर्डे व डॉ. अथर्व यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 15

टेंभुर्णी -येथील डॉ. अथर्व प्रदीप मुळे व डॉ. अनिकेत सुरेश बोर्डे या दोघांनी नुकतीच एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली. याबद्दल या दोघांचा स्थानिक मानव सेवा मंडळातर्फे रविवारी सत्कार करण्यात आला. येथील हिना ड्रेसेस मध्ये आयोजित या सत्काराला उत्तर देताना दोघा डॉक्टरांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांसोबत आई-वडिलांना दिले. आपण ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य सेवा देऊन आपल्याला मिळालेल्या आरोग्य सेवेच्या या संधीचे सोने करू असेही ते म्हणाले. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीवर या दोघांनी मिळवलेले यश परिसरातील युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. टेंभुर्णी सारख्या ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी आता एमबीबीएस ची पदवी घेऊन पुढे येत आहे ही गोष्ट गाव आणि परिसरासाठी अभिमानास्पद आहे. असे विचार यावेळी मानव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी अनेकांनी आपल्या भाषणातून डॉ. अथर्व व डॉ. अनिकेत यांच्या बद्दल गौरवोद्गार काढीत त्यांना उज्वल आरोग्य सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानव सेवा मंडळाचे अलकेश सोमानी यांनी केले. कार्यक्रमाला मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव नसीम शेख, सुरेश बोर्डे, प्रदीप मुळे, , अलकेश सोमानी, भिकनखा पठाण, संतोष शिंदे, भागाजी वाघमारे, सुनील अंभोरे, संजय निकम, बालाजी मगर, दत्तू मुनेमाणिक, प्रा. शैलीप्रकाश वाघमारे, ज्ञानेश्वर उखर्डे, मुरली कुमकर सेवानिवृत्त फौजी रामू जंगले, शेख साबेर, फकरू कुरेशी, शकील तडवी, शेख सैफ, फवाज कुरेशी, शेख नजमोद्दीन आदींची उपस्थिती होती. फोटो – एमबीबीएस पदवी शिक्षण प्रथम श्रेणी पूर्ण केल्याबद्दल टेंभुर्णी येथील डॉ. अथर्व मुळे व डॉ. अनिकेत बोर्डे यांचा सत्कार करताना मानव सेवा मंडळाचे पदाधिकारी. .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे