pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; आनंदी अय्यर यांना पुरस्कार

0 4 4 9 9 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.26

आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात जालना येथील आशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालिका आनंदी
सुब्रमणियम अय्यर यांना एमएसएमई सुपर स्टार पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार राज्यसभा सदस्या डॉ. ज्योती वाघमारे, झोनल जनरल मॅनेजर एनएसआयसी डी.डी.महेश्वरी, हस्तकला, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार
सहाय्यक संचालक सुरेश नारायण तांडेकर तसेच संस्थापक, झेप उद्योजिनी पौर्णिमा शिरीषकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. आनंदी अय्यर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संगणक शिक्षण, डिजिटल साक्षरता,महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे जालना जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर,विद्यार्थी, पालक व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत
आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 9 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे