pub-7425537887339079
ब्रेकिंग

जायकवाडी या नव्याने प्रस्तावित असलेल्या सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चाच्या समांतर पाणी पुरवठा योजनेचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये-कैलास गोरंटयाल

0 5 3 6 3 6
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनीधी,दि.13
जालना – जायकवाडी या नव्याने प्रस्तावित असलेल्या सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चाच्या समांतर पाणी पुरवठा योजनेचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असा खोचक टोला जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी आज शुक्रवारी विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचा नामोल्लेख न करता त्यांना लगावला. याव्यतिरिक्त नवीन काही मंजूर करून त्यासाठी बाराशे नाही तर चौदाशे कोटी रुपये मंजूर करून आणा त्याचे आम्ही स्वागतच करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहरातील हॉटेल दुर्गा येथे आज शुक्रवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस जालना मनपाच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत,पाणी पुरवठा सभापती सौ.पूनम स्वामी, ज्येष्ठ नगरसेवक महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, रिमा काळे आदींची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी जायकवाडी – जालना या समांतर पाणी पुरवठा योजना आणि त्यासाठी मागील सहा ते सात महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्याची विस्तृत माहिती देऊन त्याबाबतचे लेखी पत्र उपस्थीत पत्रकारांना दिले. जालना शहरातील २०६० मधील लोकसंख्या गृहीत धरून उपरोक्त पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्याच्या सूचना भाजपा नेत्यांनी दिल्याचे सांगून नाशिक येथील एकम व्हेंचस या कंपनीकडून सदर योजनेचा डीपीआर तयार करून घेण्यात आल्याचे गोरंटयाल यांनी स्पष्ट केले. सदर प्रस्तावित पाणी पुरवठा योजना ही वर्ल्ड बँकेच्या आर्थिक सहाय्यातुन करण्यात येणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण मे २०२६ मध्ये मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत योजनेच्या पडताळणीसाठी वर्ल्ड बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जालना येथे पाठवले होते. त्यानंतर दि.२८ जुलै २०२६ रोजी वर्ल्ड बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैठण येथील जॅकवेल आणि अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. तसेच दि.९ ऑगस्ट २०२६ रोजी देखील वर्ल्ड बँकेच्या श्री अनिकेत आणि शकील नामक अधिकाऱ्यांनी या योजनेच्या अनुषंगाने जालना येथे भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दि.३१ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्रालय पातळीवरील श्री रंगानायक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत जालना मनपा आयुक्त अंजली शर्मा सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत डीपीआर मध्ये असलेल्या तृटीचे कारण पुढे करून जालन्यासाठी प्रस्तावित असलेली जायकवाडी – जालना ही समांतर पाणी पुरवठा योजना नामंजूर करण्यात आली होती असे सांगून गोरंटयाल म्हणाले की, यानंतर आपण दि.८ ऑक्टोंबर २०२६ रोजी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देऊन जायकवाडी – जालना या समांतर योजनेचा प्रस्ताव आणि आवश्यक निधीसाठी जागतिक बँकेकडे शिफारस करण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मित्राच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे गोरंटयाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायणराव कुचे, आ.संतोष पाटील दानवे, भाजपाचे जालना शहर महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आणि आपण स्वतः यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा उपरोक्त प्रस्तावित योजनेच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले असतांना कुंभकर्णा सारखी झोप काढणाऱ्या जालन्याच्या विद्यमान आमदाराने सदर योजना आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर होणार असल्याचा अजब आणि हास्यास्पद केलेल्या दाव्याची गोरंटयाल यांनी पत्रकार परिषदेत चांगलीच खिल्ली उडविली. जे काम आपल्या आणि भाजपा नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले त्याचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न न करता नवीन काही योजना मंजूर करून दाखवा असे आव्हान देत नवीन योजना आणि निधी मंजूर करून आणल्यास त्याचे निश्चितच स्वागत करू असेही गोरंटयाल यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
—————————————————————-

समांतर योजनेद्वारे शहराला मिळणार ६३ एमएलडी पाणी

जायकवाडी – जालना या समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी वर्ल्ड बँकेकडून बाराशे कोटी रुपयांचा निधी मिळणार असून १०० किलो मिटरची ही योजना जायकवाडी ते शिरनेर टेकडी ते जालना या मार्गे करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे जालना शहराला दररोज ६३ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार असून पूर्वीच्या जायकवाडी – जालना आणि नव्याने प्रस्तावित असलेल्या समांतर योजना या दोन्ही योजनेमार्फत मिळून जालना शहराला भविष्यात एकुन ११५ एमएलडी पाणी मिळणार असल्याचे गोरंटयाल यांनी सांगितले.
——————————————————————–

मूलभूत सुविधांसाठी मिळणार ३० कोटींचा निधी

जालना शहरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून जालना मनपाला लवकरच सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. नगर परिषद अस्तित्वात असतांना नगरोत्थान व सुवर्ण जयंती योजनेतून निधी मिळत होता.आता मनपा असल्याने ३० कोटींचा शंभर टक्के निधी हा राज्य शासनाकडून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निधीतून जालना शहरात रस्ते,लाईट,नाल्या आदी मूलभूत सुविधांची कामे करण्यात येणार असल्याचेही गोरंटयाल यांनी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे