pub-7425537887339079
ब्रेकिंग

क्रियाशील प्रेस क्लब पनवेल – उरणची नवीन कार्यकारिणी जाहीर 

विशाल रावसाहेब सावंत अध्यक्षपदी, दिलीप कडू कार्याध्यक्षपदी तर संतोष वाव्हळ सरचिटणीसपदी 

0 5 4 4 6 2
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
पत्रकारांच्या संघटना नेहमीच पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी खंबीरपणे उभ्या राहण्यासाठी असतात, पत्रकारांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या अशा विषयांना हात घालत क्रियाशील प्रेस क्लबची स्थापना करण्यात आली. आज संघटनेच्या कार्याला ६ वर्षे पूर्ण झाली. याकाळात अनेक विविध योजना राबविण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून पार पडले. मंगळवार दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे क्रियाशील प्रेस क्लबची सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दामोदर कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
क्रियाशील प्रेस क्लब रायगडच्या पनवेल उरण युनिटच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदी रायगड संदेश वृत्तपत्राचे संपादक विशाल रावसाहेब सावंत, कार्याध्यक्षपदी लोकशक्ती न्यूजचे संपादक दिलीप कडू, सरचिटणीसपदी सार्थ लोकनीतीचे संपादक संतोष वाव्हळ यांची निवड करण्यात आली. यांच्यासह उपाध्यक्षपदी भरतकुमार कांबळे, सहचिटणीस पदी, अनिल राय, खजिनदारपदी चंद्रकांत शिर्के, सहखजिनदार पदी भूषण साळुंखे, प्रसिद्धीप्रमुखपदी विठ्ठल ममताबादे तर सदस्यपदी रामनाथ म्हात्रे, प्रदीप ठाकरे, क्षितिज कडू, असीम शेख, प्रविण पाटील, साबीर शेख, सुमेधा लिम्हण तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. परेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. तर सल्लागारपदी संस्थापक अध्यक्ष विजय कडू, साहिल रेळेकर, सय्यद अकबर हे मार्गदर्शन करण्यासाठी राहणार आहेत.
यावेळी संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात प्रत्येक महिन्याला एक – दोन उपक्रम राबविण्याबाबत ठरविण्यात आले. तसेच सार्वजनिक उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांचा गौरव, स्वच्छता दुतांचा गौरव जसे कार्यक्रम राबविण्याच्या उपक्रमाला प्राधान्य दिले जाणार असल्याचाही उल्लेख करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या हक्कासाठी तसेच त्यांच्या हक्काच्या घरांसाठी रीतसर प्रक्रिया राबविण्यात येणार असून संस्थेच्या प्रत्येक सदस्याला अधिस्वीकृती मिळवून देण्याच्या दृष्टीने काम केले जाईल, असेही ठराविण्यात आले. यावेळी नवीन सदस्य होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संघटनेचे अध्यक्ष विशाल रावसाहेब सावंत (9702153851), कार्याध्यक्ष दिलीप कडू (9224580671) तसेच सरचिटणीस संतोष वाव्हळ  (8850722523) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 4 6 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे