निकूष्ट रस्त्याचा उत्कृष्ट नमुना ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे पुलावर पडलेल्या खड्यामुळे टँक्टर पलटी झाले…

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 13
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी डावरगाव देवी रोडच्या निकूष्ट रोडच्या कामामुळे जागोजागी खड्डे पडल्याने टँक्टर पलटी झाले सदरील रोडचे काम जवळपास सहा महिन्या पासून सुरु आहे कधी रोडवर चुना टाकल्या जातो तर कधी खडी यामुळे संबंधित गुत्तेदार यांनी वेळ काढू धोरण सुरू केलेल्या अनेकदा या रोडवर आपघात घडले तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे काना डोळा करत आहेत अशी तक्रार प्रताप नवले यांनी नुकतीच केली होती आज तारीख 12 जून रोजी खाजगी पाणी पुरवठा करणारे टँक्टर सदरील पुलावर मोठे मोठाले खडे पडलेले असल्याने पलटी झाले आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसापूर्वी प्रताप नवले यांनी या मतदार संघातील आमदार संतोष रावसाहेब दानवे यांना सविस्तर माहिती दिली परंतु गुत्तेदार याकडे दुर्लक्ष करून अजून किती क होण्याची वाट बघातात अशा तक्रारी यारोडवरील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत



