त्याग समर्पणाबरोबरच, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षकाने शिकवणे काळाची गरज — नारायण पिंपळे.
डॉक्टर भरत सूर्यवंशी, व डॉक्टर प्रकाश मांडे यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त

जालना/प्रतिनिधी, दि.22
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत दरवर्षी ज्यातील प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्रशिक्षण आयोजित केल्या जाते. यावर्षी नोव्हेंबर महिन्यातील दिवाळीच्या सुट्टीमध्ये दिनांक 13 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत हे प्रशिक्षण आयोजित केलेले होते. जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक केंद्र देण्यात आले होते. जाफराबाद तालुक्यातील केंद्र श्रीमती जे बी के विद्यालयातील केंद्र मंजूर करण्यात आले होते. या केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रकाश मांटे होते. तर जिल्हा समन्वयक म्हणून डॉक्टर भरत सूर्यवंशी हे जिल्ह्यातील प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्राची समन्वय साधण्याचं काम ते स्वतः करत होते. तसेच जे बी के विद्यालयातील या प्रशिक्षण केंद्राचे सह प्रशिक्षण प्रमुख म्हणून नारायण पिंपळे माऊली हे होते. ते या प्रशिक्षण केंद्राच्या समारोपप्रसंगी बोलताना शिक्षक समूहाला संबोधित करताना म्हणाली की शिक्षकांजवळ त्याग समर्पण याबरोबरच तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण आपण घेतलं पाहिजे. मूल समजून घेताना त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तसेच वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक दत्ता देशमुख हे होते. त्यांनीही मार्गदर्शन करताना शिक्षकांनी निरीक्षण भूमिका निर्णय क्षमता विकसित केली पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थी किती कार्यक्षम असला तर त्यामध्ये कार्यक्षमता निर्माण करण्याचं कार्य शिक्षकांनी केलं पाहिजे आणि ते कराल अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सर्व प्रशिक्षकांचे सत्कार करण्यात आले. त्यामध्ये नारायण पिंपळे माऊली, प्रा. दत्ता देशमुख, डॉक्टर प्राध्यापक आनंद जाधव,प्राध्यापक दाभाडे सर, प्राध्यापक संजय वर्शील सर, माधवराव शिंदे गुरुजी, गाढवे सर, दत्ता चेके सर, उगलमुगले सर, वाघ सर, आल्हाट सर, झिंगराव सपकाळ सर, नागोराव देशमुख, दीपक देशमुख, आदींचा यथोचित सत्कार करण्यात आला. दहा दिवस चाललेल्या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांचे अपडेशन करण्यात येऊन त्यांना विविध विषयांचे ज्ञान देण्यात आले. सर्व विषयांचे नियोजनबद्ध पद्धतीने तासिका घेण्यात आल्या. विद्यार्थ्याचे मूल्यमापन कोणत्या घटकापासून करायचे आहे याचेही ज्ञान त्यांना देण्यात आले. _________________चौकट :- जालना जिल्ह्यातील सर्वच केंद्रांनी उत्कृष्ट काम केले तसेच जाफराबाद तालुक्यातील श्रीमती जेबीके विद्यालयात नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात आले असल्याचे डॉक्टर भरत सूर्यवंशी यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच डॉक्टर भरत सूर्यवंशी यांनी जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम करत असताना प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक केंद्राशी स्वतः ते संपर्कात राहून योग्य पद्धतीने कामाचे नियोजन होते की नाही यावर सतत लक्ष ठेवले. व सर्वच केंद्राशी समन्वय हा चांगल्या तऱ्हेने ठेवला. त्यामुळे टेंभुर्णी येथील जाफराबाद तालुक्याचे केंद्र हे उत्तम रीतीने चालल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. ……….
.डॉ.भारत सूर्यवंशी, जिल्हा समन्वयक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना __________________ प्रशिक्षणाबद्दल मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणार त्यांनीही समाधान व्यक्त केले आणि आमच्या मध्ये जी ऊर्जा प्रेरणा निर्माण केली त्याबद्दल त्यांनी सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले. सर्वच प्रशिक्षकांनी प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण करण्याचं काम करण्याबरोबरच शिक्षकांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षक बनवण्याचे कामही या प्रशिक्षणातून झाल्याचे सर्वच प्रशिक्षणार त्यांनी मनोगतामध्ये आपल्या मत मांडले. या कार्यक्रमाचे नियोजन संदीप जाधव, बाळकृष्ण धनवाई, निवृत्ती बनसोडे, शेवाळे, शिक्षक पिंपळे सर गुनावत सर अचलखांब सर, उगले सर, राजेंद्र पवार सर, अभिजीत साळवे सर गजानन अंभोरे, अंकुश वेलदोडे, गाढवे सर, जंजाळ सर, तसेच टेंभुर्णी परिसरातील सर्व शिक्षक वृंद व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी केले होते. प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षणार त्याची लेखी पन्नास गुणांची परीक्षा घेण्यात आली. या प्रशिक्षणात दररोज परिपाठ एका गुणवान शाळेचे वाचन त्याचबरोबर आपली मनोगते आणि प्रेरणा यावर आधारित एक बोधकथा सांगितल्या जायची.



