सिद्धार्थ महाविद्यालयात वृक्ष रक्षाबंधन उत्साहात साजरे

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29
ऑगस्ट २०२६ : पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून वृक्षांप्रती जिव्हाळा व संरक्षणाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. एस. एल. मेढे, उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे व उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी महाविद्यालय परिसरातील विविध वृक्षांना राख्या बांधून ‘वृक्षांचे रक्षण करा, पर्यावरणाचे संरक्षण करा’ असा संदेश दिला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनाही विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.
या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, वृक्षसंवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाप्रती कर्तव्यभावना निर्माण झाली. रक्षाबंधनाच्या सणाला सामाजिक व पर्यावरणीय संदेशाची जोड देणारा हा उपक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. पी. जगतवाड, प्रा. डॉ. प्रदीप मिसाळ व सौ. प्रा. डॉ. सारिका जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी प्रतिनिधी वैभव रवींद्र देवरे, विद्यार्थी निरीक्षक आदित्य साळवे व शंकर देवडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील प्रा. अनिल वैद्य यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.



