pub-7425537887339079
ब्रेकिंग

संभाजी ब्रिगेड जाफराबाद तालुका पदाधिकारी निवड जाहीर.. अध्यक्षपदी विशाल वाकडे; उपाध्यक्षपदी प्रदीप म्हस्के तर सचिवपदी सुरेश दुनगहू यांची निवड

0 4 1 4 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16

जाफराबाद संभाजी ब्रिगेडच्या जाफराबाद तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली असून, तालुका अध्यक्षपदी विशाल पाटील वाकडे, उपाध्यक्षपदी प्रदीप पाटील म्हस्के तर सचिवपदी सुरेश दुनगहू यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड व जिल्हा सचिव दत्तात्रय कपाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक चळवळीत सातत्याने श्रम, वेळ, बुद्धी व कौशल्य यांचे योगदान दिल्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या कार्याला अधिक गती देत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी जाफराबाद येथील संभाजी ब्रिगेड कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कोशाध्यक्ष संतोष गाजरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय उपाध्यक्ष विजय वाढेकर उपस्थित होते. तसेच जालना जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश पवार, जिल्हा सचिव दत्तात्रय कपाळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पंडीत, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील लोखंडे, सचिव प्रा. विनोद शेळके, ज्ञानेश्वर पाबळे, प्रभू गाढे, भरत मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 4 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे