रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एचओसी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुखपदी (एचओडी) पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे उरण परिसरासह शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी या पदोन्नतीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. वासुदेवन पिल्लई सर, प्राचार्य डॉ. जगदीश डब्लू. बाकल सर आणि फ्रनव पिल्लई सर यांचे मनःपूर्वक आभार मानले. या मान्यवरांनी दाखविलेला विश्वास, दिलेले प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विभागप्रमुख म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक बदलांशी त्यांना अवगत करणे तसेच संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार डॉ. शेख यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या पदोन्नतीमुळे उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दुप्पट मदत द्या; तीन हेक्टरची मर्यादा लागू करा! केंद्राच्या सुधारित मदत निकषांवर डॉ. संजय लाखेपाटील यांची भूमिका
2 hours ago
अखिला मेमोरियल ट्रस्टच्या वतीने रानसई मार्गाचीवाडी व सागाचीवाडीवरील आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
2 hours ago
शेखर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.
2 hours ago
अंबड पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक प्रमोद वाघ यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी
2 hours ago
“चित्र म्हणजे गुंतवणूक”– चित्रकार संतोष आवटी
1 day ago
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे ॲड निलेश हेलोंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
1 day ago
पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
1 day ago
जिल्हा परिषद शाळा देळेगव्हाणच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी प्रकाश कापसे; उपाध्यक्षपदी सागर बनकर अनेक वर्षांपासून रखडलेली निवड प्रक्रिया अखेर पूर्ण; सात सदस्यांच्या बहुमताने निवड
1 day ago
खानापूर येथे शिक्षण परिषद; एआय तंत्रज्ञानासह विविध विषयांवर संवाद