pub-7425537887339079
ब्रेकिंग

शनिवारी जिल्ह्यातील चार मंडळात समाधान शिबिराचे आयोजन

0 4 0 5 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.27

जिल्ह्यातील नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा क्र. 1) राबविण्यात येत आहे. मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळामध्ये या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारात पोहोचवण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत प्रलंबित नोंदी अद्ययावत करणे, डिजिटल सेवा पोर्टलवरील प्रकरणांचा निपटारा करणे आणि ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ अंतर्गत तातडीने दाखले व सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महसुली अडचणींमुळे अडकलेली सर्वसामान्यांची कामे या शिबिरांच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमानुसार, शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या मंडळामध्ये ही शिबिरे पार पडणार आहेत. यामध्ये जालना तालुक्यातील विरेगाव मंडळातील साळेगव्हाण महादेव मंदिर, बदनापूर तालुक्यातील सेलगाव मंडळात जि.प. शाळा सेलगाव, अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळातील श्री. गुरुदेव विद्यामंदिर वडीगोद्री आणि भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळातील मारोती मंदिर हसनाबाद या ठिकाणांचा समावेश आहे. नागरिकांनी आपल्या कामांशी संबंधित आवश्यक कागदपत्रासह या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे