महाराष्ट्रातून पारितोषिक पटकावून जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या ‘इतिहास महाराष्ट्राचा २०२६’च्या अंतिम फेरीत आपल्या बालकलावंतांनी अतिशय सुंदर, दम दार आणि कौतुकास्पद सादरीकरण केले. आपल्या सर्वांच्या मेहनतीचे आणि कलागुणांचे आज महाराष्ट्राच्या व्यासपीठावर सुंदर दर्शन घडले.
*बालरंगभूमी परिषद, जालना जिल्हा शाखेतर्फे अंतिम फेरीसाठी ३ संघ पाठविण्यात आले होते. त्यापैकी २ संघांनी संपूर्ण महाराष्ट्रातून पारितोषिक पटकावून जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामध्ये एकल मोठ्या गटात ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी संबोधी संदीप इंगोले हिने पारितोषिक पटकावले आहे.तर संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना यांनी समूह गटात पारितोषिक पटकावले. हे पारितोषिक बाल रंगभूमी मुंबई अध्यक्षा नीलम ताई शिर्के /सामंत प्रख्यात लोक कलावंत डॉ. गणेश चंदनशिवे, दिग्दर्शक अभिनेते दिगंबर नाईक, ज्येष्ठ रंगकर्मी तथा बालनाट्य प्रशिक्षक श्री संजय हळदीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
या यशासाठी तिन्ही संघांतील सर्व बालकलावंत, त्यांचे पालक, शिक्षक, दिग्दर्शक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक* यांचे मनःपूर्वक अभिनंदन जालना शाखेच्या अध्यक्षा सिने अभिनेत्री वैशाली दाभाडे व कार्याध्यक्ष प्रा.डॉ.सय्यद अमजद उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ. विनोद जाधव (प्रशासन) उपाध्यक्ष (उपक्रम) श्रीमती अस्मा शेख, प्रमुख कार्यवाह भगवान तायडे, कोषाध्यक्ष राजेश राऊत यांच्या तर्फे करण्यात आले.
हे यश केवळ पारितोषिकाचे नसून बालकलावंतांच्या मेहनतीचे, जिद्दीचे, आत्मविश्वासाचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या पालक व मार्गदर्शकांच्या योगदानाचे प्रतीक आहे.
बालरंगभूमी परिषद, शाखा जालना बालकलावंतांना व्यासपीठ, प्रशिक्षण आणि कलात्मक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही विविध उपक्रम सातत्याने राबविणार आहे असे आश्वासन बाल रंगभूमी शाखा जालना यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सर्व विजेत्या बालकलावंतांचे आणि सहभागी झालेल्या प्रत्येक बालकलावंताचे अभिनंदन सर्व जालना जिल्ह्यातून होत आहे.




