pub-7425537887339079
ब्रेकिंग

पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे उरण मध्ये “नवदुर्गा सन्मान सोहळा” उत्साहात संपन्न

0 4 9 5 7 7
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या उरण पत्रकार उत्कर्ष समिती आणि महिला उत्कर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात समाजसेवा, मनोरंजन, प्रबोधन, आदर्श शिक्षिका, पत्रकारिता, कला, क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मुली आणि महिलांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम उरण मधील नगराज शेठ सीबीएसई स्कूल मध्ये संपन्न झाला.
पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबासो कालेल, सिनेअभिनेत्री दीपिका पाटील, नगराजशेठ सीबीएसई स्कूलचे व्यवस्थापक तथा जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, स्कूलच्या प्रिन्सिपॉल ज्योती म्हात्रे मॅडम, आणि सोहळ्या साठी निमंत्रित नवदुर्गा आणि त्यांचा परिवारांतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबासो कालेल यांनी सोहळ्या साठी उपस्थित नवदुर्गाना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपले मार्गदर्शन पर विचार मांडताना सांगितले की आपल्या घरची गृहिणी हीच खरी नवदुर्गा असते तिची अनेक रूपे आपल्याला घरातच दर्शन देत असतात ज्या घरांतील गृहिणी साक्षर, व्यवहारदक्ष, आणि निरोगी असते ती आपल्या घरांतील प्रत्येक सदस्याला पुढे घेऊन जाते त्यामुळे प्रत्येक महिला ही आरोग्य संपन्न असणे काळाची गरज असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले प्रत्येक महिलेने प्रथम स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, महिलांचे प्रमुख आजार नेमके कोणते हे सविस्तरपणे सांगून त्या संदर्भात घ्यावयाची काळजी आणि त्यावरील उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थित महिलांमध्ये जनजागृती केली.
तर पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष अशोक म्हात्रे यांनी उपस्थित महिलांना नव रात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत उरण तालुक्यात पत्रकार उत्कर्ष समितीचे हे पहिलेच वर्ष असून  उरण तालुक्यात अशा प्रकारचा नवदुर्गा सन्मान सोहळा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. अतिशय अल्पावधीत पत्रकार उत्कर्ष समितीच्या महिला अध्यक्षा पूजा ताईने अतिशय सुरेख पणे या सोहळ्याचे नियोजन केले असून समाज्यांतील उच्च शिक्षित ते समाज सेवेंतील शेवटच्या स्तरापर्यंत दैनंदिन समाजाची सेवा बजावीणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या निमित्ताने केला गेला ही त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे; समाजात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नवदुर्गाचा सन्मान करण्याची संधी त्यामुळे मला मिळाली हे मी माझे भग्य समजतो, डॉ. कलेल यांनी सांगितल्या प्रमाणे समाजांतील सर्वच महीलांसाठी पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने पत्रकार उत्कर्ष समितीच्या महिला अध्यक्षा पूजा ताई यांनी लवकरच महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थित नवदुर्गाना नमस्कार करून नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.असे अशोक म्हात्रे यांनी मत व्यक्त केले.
शेवटी मान्यवरांच्या हस्ते समाजसेवा, शैक्षणिक, आरोग्य, पोलीस, पत्रकारिता, क्रीडा आणि रिक्शा चालक, एस.टी, बस वाहक व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा  ५० नव दुर्गाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य गीताने या सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 5 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे