अज्ञात वाहनाच्या धडकेत टेंभुर्णीचे माजी सरपंच विष्णू जमधडे यांचे अपघाती निधन,

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16
टेंभुर्णी येथील राजकारनातील एक प्रमुख असलेले व्यक्ती टेंभुर्णी नगरिचे माजी सरपंच व तंटा मुक्त समितीचे माजी अध्यक्ष राहिलेले सोबत राजकारणात आपला वेगळा ठसा ठेवणारे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेले विष्णू भाऊ अपघातात गेल्याने गावात शोककळा पसरली. मनमिळाऊ स्वभाव हा त्यांचा स्ताई भाव होता. तसेच, कोणाचेही काम करताना नकार न देणे, व कामासाठी स्वतः हजर असणे ही त्यांची ओळख होती. लोकांमध्ये मिसळून राहणे त्यांना आवडत होते. राजकारणापेक्षाही समाजकारण हे त्यांच्या रक्तात भिनलेले होते. सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे व नेहमीच एका फोनवर कुठे हजर होणारे विष्णू भाऊ, भाऊ नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात येथील ग्रामीण रुग्णालयाकडे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. संध्याकाळी कुमकर यांच्या शेतातून एका कार्यक्रमातून घरी येता वेळी सुद्रिक यांच्या शेतजवळ टेंभुर्णी जालना मुख्य रोड वर एका अज्ञात वाहनाने जोरात धडक देऊन त्यांचा अपघात मध्ये मृत्यू झाला. मृत्यू समयी ते 68 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ,भाऊजाई बायको दोन मुले एक मुलगी सुना नातू नातवंडे असा परिवार आहे.सकाळी 9 वाजता त्यांच्या शेतात अंत्य विधी करण्यात आला.या वेळी मोठा जण समुदाय उपस्थित होता.



