pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची धडक मोहीम; 4 हजार 100 रुपयांचा दंड वसूल

अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई

0 4 9 7 2 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.26

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपरीधारकांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने कारवाई केली. या मोहिमेत विविध कलमांनुसार 10 पानटपऱ्यांवर कारवाई करून एकूण 4 हजार  100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी अंबड चौफुली परिसरात अवैधरित्या गुटखा, तंबाखू, मावा, जर्दा, खर्डा आणि सुट्ट्या सिगारेटची विक्री करणाऱ्या तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार आहेत. पानटपरीधारकांनी कायद्याचे पालन करावे आणि अवैध तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शिवप्रसाद एखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विकास चेके तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदीप गोरे, सायकोलॉजिस्ट सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे आणि ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायके यांच्या सहभागातून करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 2 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे