pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथील हॉटेल सातबाराला आग : 11 टुमदार अद्यावत केबीन जळून खाक : बारा लाखाचे नुकसान

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.22

टेंभुर्णी जाफराबाद सडकेवर टेंभुर्णी पासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल सात बारा या हॉटेलला मंगळवारी पहाटे आग लागली. या आगीत हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या सर्व टुमदार अकरा अद्यावत केबीन जळून खाक झाल्या. यात जवळपास दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती हॉटेल सूत्रांकडून कळाली आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी ही आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे कळते. दरम्यान पहाटे मॉर्निंग वाकला जाणाऱ्यांनी ही आग लागल्याची माहिती हॉटेल मालकाला दिली. त्यामुळे हॉटेल कर्मचारयासह शेजारील शेतकरी व मित्रपरिवार मदतीला धावल्याने टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली गेली. आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे अन्य मोठे नुकसान टळले. नसता आग लागल्यापासून काही अंतरातवर असलेल्या हॉटेलच्या किचन रूम मध्ये भरलेले गॅस सिलेंडर होते. यामुळे मोठा स्फोट होऊन आणखी विघटित घडले असते अशी भीती हॉटेल मालकांनी बोलून दाखविली. टेंभुर्णी पासून एक किलोमीटर अंतरावर जाफराबाद टेंभुर्णी सडकेवर गौतम म्हस्के व धनराज देशमुख यांच्या मालकीचे हॉटेल सातबारा व बार सेंटर आहे. या हॉटेलला मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत हॉटेलच्या मागील भागाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. यात वेळूच्या बांबूपासून मोठ्या कलाकुसरीने बनवलेल्या टुमदार केबीनवरील कौलारूसह पंखे, खुर्च्या, टेबल आदी साहित्य आगीत भस्मसात झाले आहे. याशिवाय या ठिकाणी लावलेले मोठाले लोखंडी अँगल ही वाकून अस्ताव्यस्त झाले आहे. या आगीत जवळपास दहा ते बारा लाखाचे नुकसान झाल्याचे हॉटेल मालक गौतम म्हस्के यांनी सांगितले. दरम्यान पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी या आगीची बातमी हॉटेल मालकाला दिल्यामुळे पुढील मोठे नुकसान व जीवित हानी टळली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे