होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.

टेंभुर्णी/प्रतिनिधी,दि.30
होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 301वा जन्म उत्सव साजरा होत आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या मराठा साम्राज्यातील एक अत्यंत कर्तबगार, न्यायप्रिय व प्रजाहितदक्ष, राणी होत्या. माळवा प्रांतावर यशस्वीपणे राज्य करत त्यांनी आपल्या कार्यकाळात अभूतपूर्व समाज सुधारणा केली. त्याचबरोबर मंदिराचा जीर्णोद्धार केला, प्रशासन कारभार कसा पद्धतीने चालावा याचा उत्तम नमुना त्या काळात राज्यकर्त्यांसमोर ठेवला. दानधर्म कसा करावा समाज हितदक्ष कसं राहावं याची चुणूक त्या काळात त्यांनी दाखवली. 31 मे 1725 हा त्यांचा जन्मदिवस. संपूर्ण भारत वर्षामध्ये त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. त्यांनी आपल्या कार्यात प्रशासन व्यवस्था, न्यायव्यवस्था, व्यापार, उद्योग, धार्मिक कार्य, लोककल्याणकारी कार्य, स्त्रियांचे रक्षण,. यावर विशेष भर दिला. त्यांनी 29 वर्ष राज्यकारभार सांभाळताना या सर्व गोष्टींचा विचार केला, म्हणून त्यांना लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक, आधी आदर युक्त उपाधींनी आदरांजली वाहिल्या जाते. ज्या मनगटात बळ, बुद्धी, आणि चातुर्य आहे , तोच स्वकर्तुत्वावर लोकाभुमीक राजा होऊ शकतो हा संदेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिला. ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केल्या जातो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना विशेष आदरांजली वाहिल्या जाते. त्यांनी समाजासाठी व राज्य करत असताना लोकांसाठी, सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अंधश्रद्धा व अनिष्ट चालीरीतीचा बिमोड, मुल दत्तक वारसा हक्क, प्रजेविषयी तळमळ, यावं अशा अनेक समाज सुधारणांच्या कृतिशील कार्य केले आहे. ज्या काळात सतीश आणि ही प्रथा होती, त्या काळात त्यांनी पती खंडेराव यांना वीरमरण आले त्यानंतर हा पुरोगामी विचार रुजविला. या पुरोगामी विचारांमध्ये धर्म रूढी परंपरा या पलीकडे जाऊन कार्य करण्यासाठी जनतेच्या सेवेसाठी आपण आहोत ही भावना त्यांनी स्वतःच्या मनामध्ये रुजविली. पती त्यानंतर सासरे दुःखाला कवटाळण्यापेक्षा दुःखाला सामोरे जाऊन समाज हितदक्ष कार्य करणे हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून कार्य केले. अहिल्यादेवी होळकर आणि धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता,बंधुता,आणि न्याय या तत्त्वज्ञानाप्रमाणे कार्य केले. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक तत्त्वज्ञानी राणी होत्या, असा इतिहास सांगतो. मल्हाररावाच्या मृत्यूनंतर मल्हारवांच्या मृत्यूनंतर आपली राजधानी इंदूर वरून महेश्वर या ठिकाणी नेली. त्या मजूर, कारागीर, विणकर, कलावंत, साहित्यिक, यांच्या विकासासाठी जमीन घर पैसा उपलब्ध करून दिला. जनावरांसाठी कुरणे राखीव ठेवली. सर्वधर्मसमभावाच्या आदर्शासाठी त्यांनी मंदिरे, मशिदी, दर्गे,व विहार बांधली. अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्याचबरोबर पर्यटनाला चालना मिळण्यासाठी त्यांनी महारस्ते बांधली. मजुरांना काम मिळावे व सर्व धर्मातील लोक एकोप्याने राहावे यासाठी कार्य केले. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे यांच्यासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह करून दिला. यातून अहिल्यादेवी चे सामाजिक भान दिसून येते. त्यांनी एकच धर्म आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये पाळला तो म्हणजे मानवता धर्म, अंधश्रद्धेच्या पाठी आंधळेपणानं जाता डोळसपणे विचार करून अंधश्रद्धा बाजूला सारल्या. खाजगी उत्पादनाचा विचार हा लोककल्याणकारी उपयोगासाठी आणला. म्हणूनच त्या लोकमाता राष्ट्रमाता झाल्या. मल्हार होळकर आणि त्यांना प्रशासकीय कारभार, सैन्याच्या कामामध्ये पारंगत केलेले होते. मल्हारराव होळकरांच्या एक कर्तबगार सुन म्हणून त्यापुढे येत असतानाच त्यांचे पती खंडेराव यांना वीरमरण आल्यानंतर मल्हार होळकरांकडे नेतृत्व होते परंतु मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर संपूर्ण माळवा प्रांताची जबाबदारी अहिल्यादेवी होळकर यांच्या खांद्यावर येऊन पडली. मल्हारराव होळकरांकडून राज्यकारभाराचे धडे मिळालेले असल्यामुळे, त्यापुढे राज्यकारभार पाहू लागल्या. या सैन्याचे ही नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांना सेनापाती म्हणून नेमले. अहिल्यादेवी यांनी सामाजिक भान ठेवत त्या पद्धती कधीच पाळली नाही. त्या नेहमीसाठी राज्य कारभार करत असताना जनता दरबार भरवीत असे, आपण जनतेचा सेवेसाठी आहोत हा भाव त्या नेहमी पाळत असत. जनतेची कार आणि ऐकण्याचा त्यांचा प्रघात होता. धन्यवाद रस्ते विकास, किल्ले बांधणे त्यांचा विकास करणे, मराठीमध्ये उत्सव भरवणे एक काम ते नेहमी करत असत. हिंदू मंदिरांमध्ये पूजा आरत्या सुरू राहावी यासाठी त्यांचा कटाक्ष असे. माळवा प्रांताच्या बाहेरही त्यांनी अन्य प्रांतांमध्ये धर्मशाळा, विहिरी, घाट, मंदिरांचा जिर्णोद्धार सामाजिक व धार्मिक कामे केलेली आहे. अहिल्यादेवी नी जनतेच्या व रयतेच्या कल्याणासाठी अनेक कामे केलेली आहे. महेश्वर येथील राजधानी अहिल्यादेवीची जणू काही संगीत काव्य साहित्य व उद्योग यांची एक संस्था होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी मोरोपंत व शाहीर आनंद फंदी यांना व साईराम यांना अहिल्याबाईनीआश्रय दिला होता. अहिल्याबाईंच्या राज्यकारभारात कामगारांना,कारागिरांना, मूर्तिकारांना वेतन मिळत असे. 19 व्या, विसाव्या शतकातील भारतीय, इंग्रजी, व अमेरिकन इतिहासकार हे मानतात आजही भारतात अहिल्यादेवी यांना संतांचा सन्मान मिळतो. अहिल्यादेवी चा इतिहास त्यांनी राजकारणातील बारकावे,तत्व,नीती, नियम, सूत्रे तसेच या देशाची भौगोलिक स्थिती, सामाजिक व राजकीय स्थिती, रणांगणातील आखाडे व बारकावे व्यवस्थित समजावून घेऊन राज्यकारभार केला, म्हणूनच त्यांना एक तत्त्वज्ञानी राणी असे म्हटले जाते. अहिल्यादेवी समाज सुधारणा बरोबरच न्याय सुधारणा करताना आपल्या सैन्यांमध्ये पुरुषाप्रमाणेच महिलांचाही सैन्यात समावेश करून स्त्री पुरुष समानता व न्यायवादी भूमिका केल्यामुळे, न्याय देवता म्हणून सुद्धा अहिल्यादेवीना ओळखल्या जाते. शेतकरी सुखी तर जग सुखी, ही संकल्पना राबवताना त्यांनी आपल्या राज्यामध्ये विहिरी बांधल्या, शेतकऱ्यांची जाचक करातून मुक्तता केली, गोपालनाचे महत्त्व समजावून मोठ्या प्रमाणावर गोपालन घडून आणले. अनेक विद्वान लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना भेटण्यासाठी येत असेल त्यांच्याशी चर्चा करीत असत आणि भेट झाल्यानंतर ते त्याच ठिकाणी राहत असत, अनेक विषयांचे विद्वान व्याकरणकार, शास्त्री, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य,हकीम, यांचा समावेश असे. अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील महाराष्ट्रातील मंदिरे, घाट, वाडे, धर्मशाळा व इतर कामे यांची माहिती आपल्याला पुढील प्रमाणे देता येते, चांदवड चा रंग महाल, खडकी पिंपळगाव चा होळकर वाडा, काठापुर चा वाघ वाडा, पंढरपूरचा होळकर वाडा, लासलगाव चा अहिल्यादेवी चा किल्ला, पळशीचा पळशीकर वाडा, अकोले तालुक्यातील विहिरी उदाहरणार्थ वाशेरे विरगाव, वीरगाव ची बारव, ओझर येथे दोन विहिरी व एक कुंड, कोल्हापूर येथे मंदिर पूजेसाठी सहाय्य, घृष्णेश्वर येथे शिवालय तीर्थ, चांदवड वाफेगाव येथे रेणुका मातेचे मंदिर, पंचवटी नाशिक येथे राम मंदिर,गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर धर्मशाळा आणि रामघाट, पंढरपूर येथे राम मंदिर तुळशीबाग होळकर वाडा सभा मंडप, धर्मशाळा व बाजीराव विहीर, भीमाशंकर येथे गरीबखाना, जेजुरी येथे मल्हार गौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार नावाचे तलाव, जळगाव येथे राम मंदिर, बीड येथे घाटाचा जिर्णोद्धार, संगमनेर येथे राम मंदिर, साखरगाव येथे विहीर, समनापुर येथे पुरातन बारव, पुणतांबा येथे गोदावरी नदीवर घाट, सप्तशृंगी येथे धर्मशाळा चौंडी येथे चौंडेश्वरी मंदिर,सिनेश्वर महादेव मंदिर, धर्मशाळा व घाट, आधी दानधर्मातून व पुण्यकर्मातून केलेली ही सर्व कामे आहे. यातून अहिल्यादेवींचा दानशूरत्वचा भाव लक्षात घेऊन अहिल्यादेवींचे धातृत्व लक्षात येते. अहिल्यादेवी बद्दल म्हणावेसे वाटते की दूरदृष्टी ठेवून एका स्त्रीने केलेला राज्यकारभार, व लोक कल्याणकारी राजाची निर्मिती असते हे दाखवून देण्याचा काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. म्हणूनच एक तत्त्वज्ञानी राणी , म्हणून अहिल्यादेवींचा उल्लेख करावासा वाटतो.
संग्राहक :- प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, प्रांत उपाध्यक्ष, वेध रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्र, सचिव शिवराम पाटील प्रतिष्ठान टेंभुर्णी, तालुका जाफराबाद जिल्हा जालना. चित्र:- चित्रकार संतोष बाबुराव आवटी




