सण साजरे करताना आनंदा बरोबरच सुरक्षेची काळजी घ्या, — सपोनी अविनाश राठोड, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे नागरिकांना आव्हान

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.7
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड जनतेला आव्हान केले आहे की, सध्या सणासुदीचे दिवस असून आनंदाच्या वातावरणामध्ये कुठेही न डगमगता आनंद साजरा करत असतानाच आपल्या सुरक्षेची सुद्धा काळजी घ्यावी. सध्या सणासुदीचे दिवस असताना दाग दागिने चे सुरक्षित ठिकाणी ठेवावे, घरफोडीच्या घटना किंवा जनावरे चोरीच्या घटना घडू शकतात तरी आपण स्वतः काळजी घ्यावी. गंभीर घडत असेल त्यावेळेस पोलीस स्टेशनचे तात्काळ संपर्क साधावा. गावाला बाहेरगावी जात असताना आपल्या घराची कुलपे मजबूत असावी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनाने काळजी घेण्यात यावी. घराच्या अवतीभोवती पुरेसा प्रकाश योजना असावी. बाहेर जाताना किंवा बाहेरगावी जाताना आजूबाजूच्या नातेवाईकांना कल्पना देऊन जावी. दुकाने फॉर्म मोठ मोठाली उद्योग यांनी आपल्या फर्मच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवावे. अनोळखी व्यक्ती पासून सावध असावे. जनावर चोरीच्या सुद्धा घटना घडत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी गोठ्यात बांधून ठेवावे. त्यांच्यावर सतत लक्ष असू द्यावे. रात्रीच्या वेळेस गोट्याभोवती प्रकाश योजना असावी. अशाच व्यक्ती अनोळखी व्यक्ती, अनोळखी वाहन,किंवा काही घटना घडत असल्यास पोलिसांशी संपर्क करून 112 वर संपर्क करावा. जनावर चोरी हा दखलपात्र गुन्हा असून त्यावर कडक गुन्हे दाखल होऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी पोलिसांची सहकार्याची भूमिका घ्यावा घ्यावी. काही अघटीत घडत असल्यास किंवा गंभीर काही संशयास्पद घडत असल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क करावा. पोलीस सदैव आपल्या सहकार्यासाठी हजर असेल. सदरक्षणाय खलनिग्रहण आहे.




