pub-7425537887339079
ब्रेकिंग

दिव्यांग पत्रकार राहुल मुळे यांना पाच तास डांबून अमानुष मारहाण; आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी

पत्रकारांच्या शिष्ट मंडळाने घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट; कारवाईचे आश्वासन

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2

जालना येथील ‘दिव्यांग वार्ता’चे संपादक तथा पत्रकार राहुल सुरेश मुळे यांना पाच तास बेकायदेशीरपणे एका खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहाण करण्यात आल्याच्या घटनेमुळे पत्रकार क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार राहुल मुळे हे काही दिवसांपूर्वी राजूर रोड परिसरातील तांदुळवाडी शिवारातील एका वॉटर पार्क परिसरात गेले होते. त्या परिसरासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा राग मनात धरून काही व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने पकडून बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काठ्या, लाठ्या आणि पाईपने मारहाण निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राहुल मुळे यांना काठ्या, लाठ्या तसेच पाईपने मारहाण करण्यात आली. त्यांना दुपारी सुमारे २ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत एका छोट्या खोलीत डांबून ठेवण्यात आले व बाहेर जाऊ देण्यात आले नाही. हा प्रकार बेकायदेशीर कैद व मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत अपमान विशेष म्हणजे राहुल मुळे हे दिव्यांग असून त्यांच्या दिव्यांग पायावर तसेच डोळ्यांजवळ मारहाण करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी “लंगड्या” अशा अवमानकारक शब्दांचा वापर करून त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे ही घटना केवळ मारहाणीपुरती मर्यादित नसून दिव्यांग व्यक्तीच्या सन्मानावर झालेला गंभीर आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. दबावाखाली बॉण्डवर स्वाक्षरी, मोबाईलचा वापर केल्याचा आरोप मारहाणीनंतर राहुल मुळे यांच्याकडून दबावाखाली एका बॉण्डवर स्वाक्षरी करून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यांच्या नावाने व्हॉट्सअॅप चॅटिंग करण्यात आल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. भविष्यात संबंधितांविरोधात बातमी प्रसिद्ध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ओजस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू या मारहाणीमुळे राहुल मुळे यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर शहरातील ओजस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेमुळे पत्रकार वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत असून दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप निवेदनात आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. राहुल मुळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्याविरोधात खंडणीसारखे खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खोट्या तक्रारी व गुन्ह्यांबाबतही संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही तपासून कारवाईची मागणी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर पत्रकार संरक्षण कायदा, अपहरण, बेकायदेशीर कैद, मारहाण, धमकी आणि दिव्यांग व्यक्तीचा अपमान यासंबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वेळीच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा या प्रकरणात तात्काळ आणि निष्पक्ष कारवाई न झाल्यास लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदनावर सर्वश्री पत्रकार धनसिंह सूर्यवंशी, लियाकत अली खान, दीपक शेळके, आमेर खान, संतोष भूतेकर, सुनील भारती, सय्यद अफसर, नरेश श्रीपत, जावेद खान, सचिन सर्वे, शेख सलीम, अनिल व्यवहारे, शब्बीर पठाण, गौतम वाघमारे, संतोष जाधव, जितेंद्र गाडेकर, एस. पी. झंवर, राम भालेराव यांच्यासह अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे