pub-7425537887339079
ब्रेकिंग

“भोकरदन नगरपरिषद वॉर्ड 8 मध्ये भ्रष्टाचाराचा कळस – नवीन कामासाठी जुन्या विटा आणि मलब्याचा वापर”

"नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण - तात्काळ कारवाईची मागणी" - बोरसे गुरुजी

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

भोकरदन नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 8 मधील गल्लीत सुरू असलेल्या नाली व पाइपलाइनच्या कामात भ्रष्टाचार उघड झाला आहे. नवीन आणि दर्जेदार साहित्य वापरण्याऐवजी ठेकेदाराकडून जुन्या विटा, दगड आणि मलबा टाकून काम केले जात आहे. याचे प्रत्यक्ष फोटोही आमच्याकडे उपलब्ध आहेत.

तक्रारीतील प्रमुख मुद्दे – मोबिन पठाण
वॉर्ड 8 चे रहिवासी श्री. मोबिन पठाण यांच्यासह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दि. 21/08/2026 रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद भोकरदन यांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की,

1. खड्डा खोल नाही:पाइपलाइनसाठी आवश्यक तेवढा खड्डा न केल्याने पाईप वरच्याच स्तरावर आहे. त्यामुळे भविष्यात फुटण्याचा धोका आहे.
2. काँक्रीट बेस नाही: नियमानुसार लागणारा काँक्रीटचा थर अजिबात टाकलेला नाही.
3. जुन्या विटा-मलबा: नवीन साहित्याऐवजी रस्त्यावरील जुने तुकडे आणि मातीचा राडारोडा टाकून काम उरकले जात आहे. _सोबतचे फोटो पहा_
4. नागरिकांची गैरसोय: मलब्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.
5. माहिती फलक नाही: कामाचा तपशील, निधी, कंत्राटदाराचे नाव दर्शवणारा बोर्ड लावलेला नाही.

मागण्या:
1. कामाची तात्काळ तांत्रिक पाहणी करावी.
2. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अभियंत्यावर कारवाई करावी.
3. काम पाडून नियमानुसार नव्याने करून घ्यावे.

आम आदमी पार्टीचा इशारा:
आम आदमी पार्टी, जालना या भ्रष्टाचाराचा तीव्र निषेध करते. शासकीय निधीचा असा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. 7 दिवसात लेखी कारवाई न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे