pub-7425537887339079
ब्रेकिंग

भारतीय तत्त्वज्ञान समाजात कीर्तनकारांनी पोहचवले – डॉ शाम महाराज नेरकर

0 5 3 0 8 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17

भारताला समृद्ध ज्ञान परंपरा लाभली आहे. वेद उपनिषदे आदी ग्रंथांमधून मानवीg जीवनातील सर्वोच्च तत्त्वज्ञान गुरु शिष्य परंपरेने पुढे आले व ग्रंथीत झाले. तेच तत्त्वज्ञान महाराष्ट्रामध्ये साधुसंतांनी आपल्या मराठी भाषेमध्ये मांडले व किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवले. तीच किर्तन परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू असून कीर्तनकारांनी हे तत्त्वज्ञान खेड्यापाड्यांमध्ये अगदी तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवले आहे . कीर्तनालाही अनुबंध असतो याचे सुंदर विवेचन त्यांनी केले. नारदा पासून सुरू झालेली कीर्तन परंपरा पुढे नामदेव महाराजांनी अगदी आचारसंहितेसह सादर केले. कीर्तनाची आचारसंहिता संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडली असून त्याचे प्रात्यक्षिक संत नामदेव महाराजांनी करून दाखविले व समाजाने अशा पद्धतीने कीर्तनाची परंपरा पुढे चालवावी हे दाखवून दिले असे प्रतिपादन डॉ शाम महाराज नेरकर यांनी संत परिषदेत बीजभाषणात केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व श्रीपती इंद्राबाई पाठक महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत परिषद महाविद्यालय संपन्न झाली. या संत परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय धर्माचार्य ह भ प डॉ जनार्दन महाराज मेटे यांनी केले. ते बोलताना म्हणाले की ज्ञानाची परंपरा ही शिव पार्वती पासून सुरुवात झाली पुढे गुरु शिष्याच्या माध्यमातून ती पुढे चालत राहिली विष्णू व शिव यांचीही ज्ञानाची परंपरा सुरू आहे. कीर्तनकारानी सखोल अभ्यास करून हे तत्त्वज्ञान समाजापर्यंत. स्वतः कीर्तनकारांनी समाजापर्यंत जाऊन हे तत्त्वज्ञान दिले. वारकरी साधुसंतांनी गावोगावी जाऊन हे तत्त्वज्ञान समाजाला दिल्याचे अनेक दाखले त्यांनी दिले. अशा संत परिषदेचे आयोजन केल्याबद्दल विद्यापीठाचे ही त्यांनी अभिनंदन केले व अशा संत परिषदांची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

भागवताचार्य श्रीमती मनीषाताई बिडाईत महाराज यांनी संत मुक्ताबाई जनाबाई ते संत बहिणाबाई यांच्यापर्यंत महिला संत व त्यांच्या कार्याचे अनेक दाखले देत महिला कीर्तनकार यांचेही कार्य महत्त्वाचे असल्याचे विशद केले. वारकरी संप्रदायामध्ये स्त्री-पुरुष हा भेद पाहिला जात नाही. भारतीय तत्त्वज्ञानाने व महाराष्ट्रातील साधुसंतांनी समाजाला ब्रह्मदृष्टी दिल्याने भेदभाव मावळून जातो. संत ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले असता त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई यांनी अभंगाद्वारे त्यांना उपदेश करून ताटी उघडण्यासाठी भाग पाडले एवढा मुक्ताबाईचा अधिकार असून त्यांची जी परंपरा महिला कीर्तनकार चालवीत आहेत त्याचे स्वागत केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

वेदांत तत्त्वज्ञानाचे अभ्यासक हभप डॉ प्रमोद महाराज कुमावत म्हणाले वारकरी संप्रदायामध्ये भेदाला महत्व नसून अभेद सांगणारा हा संप्रदाय आहे. जीवनामध्ये तत्वज्ञानाचे महत्त्व सांगताना त्यांनी शंकराचार्य व ज्ञानेश्वर महाराज या दोन महात्म्यांचे भारतीयांवर उपकार असल्याचे नमूद केले. महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव सारखा अमूल्य ज्ञान ठेवा आपल्याला दिला असून त्या ग्रंथापर्यंत पोहोचण्याची दृष्टी समाजाला प्राप्त झाली पाहिजे त्यासाठी अविरतपणे अध्ययन केले पाहिजे याचे महत्त्व विशद केले. कीर्तनापेक्षा प्रवचने श्रेष्ठ व त्यापेक्षाही पाठ श्रेष्ठ असून पाठाची परंपरा ही ज्ञानाची गंगा असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष समारोपामध्ये आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ अश्विन रांजणीकर यांनी आजीवन अध्यापन करण्याचे काम खऱ्या अर्थाने कीर्तनकार मंडळी करीत असल्याचे नमूद केले. चार जिल्ह्यांमध्ये संत परिषदांचे आयोजन केले असून या चार संत संमेलनांमधून सर्व संतांचे एकत्रीकरण करून एक मोठे संत परिषदेचे आयोजन विद्यापीठामार्फत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. समाजातील विविध घटकांना या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्राचार्य डॉ अन्विता अग्रवाल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ मीनाक्षी देव यांनी केले. सूत्रसंचलन अधिव्याख्याता योगेश्वर जाधव यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ पूजन व दीपप्रज्वलनाने केली.

प्रारंभी गायणाचार्य हभप अशोक महाराज सुरडकर, हभप डॉ आदिनाथ महाराज कदम, मृदंगाचार्य हभप ओमप्रकाश महाराज कांगणे, संवादिनी वादक हभप विष्णू महाराज राजगुडे यांच्या भजनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी हभप डॉ बालाजी महाराज जाधव,हभप एकनाथ महाराज जाधव,हभप एकनाथ महाराज वाघ, हभप सायंकर महाराज,हभप नवनाथ महाराज जाधव, दिवाकर कुलकर्णी, सुधाकर तरटे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ दत्तात्रेय डुंबरे, डॉ वैशाली जहागीरदार, राजाराम टकले, विजयक%E

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 0 8 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे