pub-7425537887339079
ब्रेकिंग

कारसह चालक जळून खाक; जाफ्राबाद चिखली मार्गावर भीषण अपघात खासगाव फाट्याजवळ लिंबाच्या झाडाला धडक; चालकाचा होरपळून मृत्य

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1

जाफ्राबाद-चिखली मार्गावरील खासगाव फाट्याजवळ रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अल्टो कारसह चालक जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह इतका जळालेला होता की ओळख पटविणेही कठीण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन प्रभाकर गवळी (वय ३५, रा. रूपनगर, जि. अकोला) हे नाशिकहून अकोल्याकडे आपल्या अल्टो कारने जात होते. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास खासगाव फाट्याजवळ त्यांच्या कारने रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारने पेट घेतल्याने चालक वाहनातच अडकून पडला आणि होरपळून त्याचा मृत्यू झाला. नाशिकहून अकोल्याकडे जाणाऱ्या दुसऱ्या वाहनातील त्यांच्या सहकाऱ्यांना बराच वेळ कार मागे येताना दिसली नाही. शोध घेत असताना अपघाताची माहिती समोर आली. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्यासह पोलीस पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि अन्य तपास प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाफ्राबाद-चिखली मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे