pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबाद तहसीलमध्ये तहसीलदार अविनाश लोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 18

जाफराबाद येथील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विविध शासकीय तथा निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील तहसील प्रांगणात पंचक्रोशीतील तमाम नागरिकांसह शहरातील विविध शासकीय तथा निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी राष्ट्र ध्वजाला सलामी दिली. यावेळी तहसीलदार अविनाश लोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक सतीश जाधव, गट विकास अधिकारी बारगिरे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, नायब तहसीलदार मंगेश साबळे, नगरसेवक दिपक वाकडे, सुरेश गवळी, रविराज जैस्वाल, नगरसेवक अनिल बोर्डे, मंडळाधिकारी काळे,

तहसीलच्या प्रांगणावर तहसीलदार लोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

मंडळाधिकारी पुष्पा सानप, लहाने, तलाठी अमोल मुरकुटे, अरुण पवार, जी. डब्ल्यू. भालके, विशाल दळवी, अंकुश सोनूने, भिमराज ब्राह्मणे, माधव साळवे, अक्षय येळवते, आर. आर. नागरे, तांगडे, फारूख कुरेशी, खंदारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी पासोडी येथील १७ सप्टेंबर १९९३ च्या लढ्यात मुरलीधर बैरागी यांनी आपल्या तरुण वयात स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करले. त्यांच्या वीर पत्नी

गंगाबाई मुरलीधर बैरागी यांचा तहसील प्रांगणावर सत्कार करण्यात आला. यावेळी जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. शहरातील न्यू हायस्कूल, ज्ञानसागर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, समर्थ विद्यालय, जि. प. प्रशाला, सिंहगड पब्लिक स्कूल यासह आदी शाळा-महाविद्यालयांच् या विद्यार्थ्यांची शहरातील विविध भागांत रॅली काढण्यात आली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे