शिक्षक मुमताज अली खान यांना जीवन गौरव पुरस्कार

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.14
जाफराबाद येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुमताज अली खान यांना यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, साहित्यिक, राष्ट्रीय व्यक्तिमत्व विकास आदी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्यधारा सेवा भावी संस्था आणि विश्वरत्न फाउंडेशनतर्फे दिला गेलेला हा पुरस्कार छत्रपती संभाजी नगर येथील डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित एका विशेष समारंभात त्यांना बहाल करण्यात आला. यावेळी पुणे विभागाचे उपायुक्त आत्माराम धाबे, मुंबईच्या शिक्षण मंत्रालयाच्या प्रथम सचिव डॉ. मेघना, मिस नागपूर आदींची मंचावर उपस्थिती होती.
या पुरस्काराबद्दल बझम डेक्कन उर्दू चे संस्थापक अध्यक्ष डॉ.सलीम नवाज हशर जाफराबादी, जमाते इस्लामी हिंद चे जिल्हाध्यक्ष सय्यद शाकीर, शेख रिजवान, नगरसेवक शेख तालेब, शेख नसीम आदींसह मित्रपरिवाराने त्यांचे कौतुक केले आहे.
फोटो – जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुमताज अली खान.



