pub-7425537887339079
ब्रेकिंग

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल व जिजाऊ ज्युनिअर कॉलेज, टेंभुर्णी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला

0 5 3 2 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पंजाब लहाने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीत व ध्वजगीताच्या सुरांनी संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीमय झाला होता.
या प्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, रझाकारांविरुद्ध दिलेला लढा आणि हुतात्म्यांचे बलिदान यांवर ओघवत्या शैलीत भाषणे सादर केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक संजय फलटणकर म्हणाले, “१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला, तरी मराठवाड्याला स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागला. स्वामी रामानंद तीर्थ, हुतात्मा गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह अनेक शूरवीरांच्या बलिदानामुळे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर नेतृत्वामुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला. आजच्या युवा पिढीने या इतिहासाची जाणीव ठेवून देशसेवेसाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे.”

जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक योगेश सवडे यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व व इतिहास पटवून दिला.
कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंजरी पिंपळे व प्रेरणा सपाटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 2 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे