pub-7425537887339079
ब्रेकिंग

सावरगाव म्हस्के येथील जि.प. शाळेला विविध संस्थानांकडून मिळाली देणगी

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.25

गावागावांतील धार्मिक संस्थांकडे मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी जमा असते. या लोकवर्गणीचा उपयोग सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी व्हावा म्हणून अनेक गाव पुढाकार घेताना दिसत आहेत. जाफराबाद तालुक्यातील सावरगाव म्हस्के येथील विविध धार्मिक संस्थानांनी एकत्रित येत गावातील जिल्हा परिषद शाळेला ५० हजार रुपयांची देणगी उपलब्ध करून दिले आहे. ज्ञानमंदिराच्या मदतीला धावून आलेल्या या धर्म मंदिराच्या सामाजिक औदार्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सावरगाव म्हस्के गावातील मारोती संस्थान, जगदंबा माता संस्थान, काळुका माता संस्थान सांप्रदायिक भजनी मंडळ व नागेश्वर संस्थान या पाच संस्थानांनी मिळून प्रत्येकी दहा हजार रुपयांची लोकवर्गणी गावातील जिल्हा परिषद शाळेला उपलब्ध करून दिली आहे. हजाराची देणगी सावरगाव म्हस्के शाळेस मिळाली संस्थांच्या संस्थांच्या या पन्नास हजार लोकवर्गणीतून शाळेसाठी तीन ४३ इंच अॅण्ड्रॉइड टीव्ही घेण्यात आल्या आहेत. गुरुवारी शाळेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी ही भेट शाळेच्या स्वाधीन केली. यावेळी संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सरपंच विष्णू म्हस्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम म्हस्के, उपाध्यक्ष नंदकिशोर काकडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मीकांत बुकदाणे, यांच्यासह संस्थानचे प्रतापराव म्हस्के, नानाभाऊ म्हस्के, राजेंद्र म्हस्के, रामभाऊ म्हस्के, नानासाहेब म्हस्के, जगनराव म्हस्के, कैलास म्हस्के, दिनकर म्हस्के, अरुण मोकळे, दगडूबा मोकळे, श्रीराम म्हस्के, संजय म्हस्के, विष्णू उगले, अंकुश म्हस्के, संतोष पडेकर, वामनराव म्हस्के, मुख्याध्यापक मुरलीधर वायाळ आदींसह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. 66 गावच्या शाळेसाठी धर्म मंदिरांना लोकवर्गणीचे आवाहन करण्यात आले होते. यात सर्वांनीच प्रतिसाद देत एका दिवसात ५० हजारांची लोकवर्गणी शाळेला दिली. यातून शाळेचे तीन वर्ग डिजिटल करण्यात आले आहे. भविष्यात गावातील सरकारी शाळा टिकविण्यासाठी ग्रामस्थांना असा पुढाकार घेणे गरजेचे आहे. सावरगाव म्हस्के गावाने घालून दिलेला हा आदर्श निश्चित अनेक गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आत्माराम म्हस्के, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे