pub-7425537887339079
ब्रेकिंग

अदिती रायची इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; कै. बाबुराव जाफ्राबादकर विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

येथील हिंदू समाज संस्था संचलित कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी अदिती नीरज राय हिने तालुकास्तरीय इंग्लिश एलोक्युशन (वक्तृत्व) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची आगामी जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद, शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता नववी व दहावीच्या गटातून झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत अदिती राय हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळविला.मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली व सत्कार करण्यात आला.

अदितीला उपक्रमशील शिक्षक संदीप इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल हिंदू समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजीव देशपांडे, सचिव चंद्रशेखर वाघमारे, उपाध्यक्ष जगदीश बडवे, भगवान धोत्रे, संचालक अरुण किनगावकर, डॉ. विनायक दसरे, कुमारजी देशपांडे, रावसाहेब अवघड, नितीन कोळेश्वर, जुगलकिशोर भक्कड तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांनी तिचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अदितीच्या या यशाबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी तिचे कौतुक केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही ती निश्चितच उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे