pub-7425537887339079
ब्रेकिंग

सावरगाव म्हस्के शाळेत योग दिन उत्साहात

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सावरगाव मस्के येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे योग शिक्षक कैलास जाधव यांनी विद्यार्थ्यांना योगा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांकडून विविध योगासने व प्राणायाम करून घेतले. आजच्या धकाधकीच्या जीवनात जर आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नियमित योगासने व प्राणायाम करून आपले शारीरिक व मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर वायाळ, शिक्षक भाऊसाहेब जाधव, गजानन डोमळे, नसीम शेख, सुनीता देशपांडे, सुभद्रा घोडके आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे