pub-7425537887339079
ब्रेकिंग

तक्षशिला बुद्ध विहारात सम्राट अशोक विजयादशमी उत्साहात साजरी!

0 4 9 5 7 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

बुद्ध धम्माचा सत्य, समता आणि विवेकाचा संदेश; विद्यार्थ्यांनी वाचनातून घडावे – संभाजी कांबळे
जालना : येथील समर्थ नगर परिसरातील तक्षशिला बुद्ध विहारात सम्राट अशोक विजयादशमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी शोभाताई उत्तमराव खरात यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात सम्राट अशोक विजयादशमीचे महत्त्व, बुद्ध धम्माची शिकवण आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे यांनी विजयादशमीचे ऐतिहासिक व वैचारिक महत्त्व विशद केले. संभाजी कांबळे यांनी बुद्ध धम्म हा सत्यावर आधारित असून त्यामध्ये अंधश्रद्धेला कोणतेही स्थान नाही, असे प्रतिपादन केले. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी केवळ भाषण ऐकण्यापुरते मर्यादित न राहता नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी. वाचनातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होऊन त्यांची वैचारिक जडणघडण होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात संबोधी इंगोले हिने भीमगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अर्चना कांबळे आणि यश साळवे यांनीही भीमगीते सादर केली. यावेळी भिकाजी साळवे यांनी भारतीय बौद्धांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या २२ प्रतिज्ञांचे वाचन केले. उपस्थितांनी या प्रतिज्ञांचे महत्त्व जाणून घेत बुद्ध धम्मातील समता, बंधुता, विवेक आणि मानवतेच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला अशोक गंगावणे, संभाजी कांबळे, चंद्रकांत वाघमारे, महेंद्र साळवे, सर्जेराव शरणागत, रवींद्र साळवे, किशोर साळवे, संदीप इंगोले,सुंदर पडीभार, अर्चना कांबळे, छायाबाई साळवे, संजय पगारे, कुलदीप गरड,ज्योती मगरे, अंभोरे ताई, सुलोचना पडघन, सुप्रिया बगळे, बाबूलाल बडोले, कमल दाभाडे, कमल इंगोले, मीनाक्षी सूर्यवंशी, अशोक दांडगे, राजाराम ढवळे, हर्षवर्धन गर्दनमारे, विजय खंदारे, अजिंक्य ओहोळ, अंजली सदाशिवे यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होते.
सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्ताने बुद्ध धम्माचा मानवतावादी विचार, अंधश्रद्धा निर्मूलन आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 5 7 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे