वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक साठी शिक्षक यांचे निवेदन.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3
जाफ्राबाद तालुक्यातील शिक्षकांची वैद्यकीय प्रतीपूर्ती देयके बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत, जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे देयके एक महिना अगोदर शिक्षक बांधवांना मिळालेली आहेत ,परंतु जाफ्राबाद तालुक्यातील शिक्षक बांधव बजेट असून सुद्धा यापासून वंचित आहेत तरी या संदर्भात माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी श्री देविदास मगर साहेब यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भालके, तालुका नेते दीपक चव्हाण, पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री बळीराम उबरहंडे, शिक्षकभारती संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय वैद्य ,नेते श्री रिजवान शेख ,संचालक श्री संजय लोखंडे, सरचिटणीस श्री सतीश राऊत,संपर्क प्रमुख श्री अनंथा जंजाळ सह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.




