pub-7425537887339079
ब्रेकिंग

आदर्श विद्यालय सायगाव(डों.) येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात

0 4 8 9 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/भगवान धनगे,दि.25

आदर्श विद्यालय सायगाव(डों.) येथे भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रचिंतक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकवर्गाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजातील सर्व घटकांच्या विकासाचा विचार मांडत ‘एकात्म मानववाद’ या संकल्पनेला महत्त्व दिले. त्यांचे विचार, साधी राहणी आणि राष्ट्रसेवेची भावना आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्याची माहिती देत त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव निर्माण होणे आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास आदर्श विद्यालय सायगाव-डोंगरगाव येथील शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 9 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे