‘ दिवाळीतील फटाक्यांचे प्रदूषण, येणाऱ्या काळात थांबेल काय? —- चित्रकार :संतोष औटी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
२०२६ नंतर येणाऱ्या दिवाळी ‘
अलनिनो मुळे होणारे प्रमुख परिणाम (कहर) विषुवृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढण्याची एक नैसर्गिक हवामान घटना आहे जेव्हा पॅसिफिक महासागरातील पाणी गरम होते तेव्हा त्याचा थेट परिणाम जागतिक हवामान चक्रावर आणि भारतासह महाराष्ट्राच्या मान्सुनवर होतो पण अलनिनो मुळे होणारे प्रमुख परिणाम कहर कडकउष्णता आणि तापमान वाढ २०२६ च्या उत्तरार्धात आणि २०२७ च्या सुरुवातीला अल निनोची तीव्रता विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज जागतिक हवामान संघटना आणि इतर हवामान संस्थांनी वर्तवला आहे त्यामुळे डिसेंबर २०२६ आणि त्यानंतरही तीव्र उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे,आपण सर्वांनी घ्यावयाची काळजी म्हणजे प्रदूषण वाचवा, प्रदूषण वाचवा म्हणजे काय करायचं उदा, फटाके घेताना आकाशात उडणारे फटाके घेऊ नका, त्यामध्ये रॉकेट असेल, आकाशात उडणारे म्हणजेच, स्काय शॉट, पॅराशुट रॉकेट, मल्टी कलर शॉर्ट, सिल्वर रेंज, स्टार शॉवर , कॉमेट शॉट, अनार, अशा प्रकारच्या फटाक्यावर बंदी घातली पाहिजे सरकारने जेणेकरून जीवित हानी होणार नाही व प्रत्येकाचे कुटुंब सुरक्षित राहतील, आणि फटाके उडवताना मोकळ्या जागेत उडवावे जेणेकरून आजूबाजूला बघून , आपण उडवत असताना फटाके काळजीपूर्वक उडवावे, प्रत्येक गावात अग्निशामक दल यांचे कार्यालय असणे आवश्यक, आणि त्या अग्निशामक दलातील जवानांना चांगल्या पद्धतीचे ट्रेनिंग देणे महत्त्वाचे जेणेकरून आज मुंबईमध्ये 17 व्या मजल्यावर आग लागलेली आहे ही आग विझवता येणे म्हणजे एवढे सोपे नाही अशा प्रकारचे आवाहन अग्निशामक दलांना घेता आले पाहिजे त्यासाठी, सरकारने अग्निशामक दलाच्या जवानांना आव्हानात्मक ट्रेनिंग देण्यात याव्या, मॉलमध्ये, तुळजाभवानी परिसर या ठिकाणी सुद्धा घटना घडली, करंडे कुटुंबातील सहा जण आगीमध्ये जळून खाक झाले, फुलंब्री मध्ये ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये आग,२०२६ यावर्षी सर्वात जास्त ठिकाणी अग्नी तांडव झाले आहे, प्रत्येक गावात प्रत्येक शहरांमध्ये , चौका चौकात पाच ते दहा हजार पेक्षा जास्त पाण्याच्या टाक्या लावाव्यात, आणि सर्वात जास्त झाडे लावा जग वाचवा ..
. दीपावली सण, आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा सण आहे, आनंदात विरजन हा कोणाचाही उद्देश नसतो. आनंद साजरा केलाच पाहिजे आणि आनंद साजरा करताना. आनंदाच्या वाटाही शोधल्या पाहिजे, आनंद अनेक प्रकारे आपण साजरा करू शकतो, अनेक वर्षापासून दिवाळीच्या सणांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी होत असते, ते आनंदासाठीच असते, परंतु आता काळ बदललेला आहे, भौगोलिक दृष्ट्या आणि खगोलशास्त्रीय दृष्ट्या आता वातावरणात प्रदूषणाची संख्या प्रदूषण वाढत आहे, या प्रदूषणात अनेक गोष्टी प्रदूषणाची वाढ करत आहे, त्यात फटाके हे एक भाग आहे, वातावरणातील प्रदूषण वाढले ते आहे, आनंदाच्या क्षणात विर्जन न घालता फटाक्यांचा आवाज कमी करत आणि नव्या पद्धतीने फटाक्याची आतिषबाजी चा शोध लावणे आता गरजेचे झाले आहे, प्रदूषण न होता त्यातूनही आनंद मिळेल असे फटाके आता शोधले पाहिजे ही काळाची गरज ठरत आहे, म्हणून म्हणावेसे वाटते की आनंदाच्या याच्यात विरजण न घालता फटाक्यांच्या आतिषबाजीला आळा घालून फटाके वाजवतानाच फटाक्यापासून प्रदूषण होणार नाही याची काळजी आता जनतेने समाजाने घेणे गरजेचे आहे, मराठी समाजानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे कोण्या एकाच्या पुढाकाराने ही होणार नाही, दीपावलीत फटाक्यांचा आनंदोत्सव साजरा करताना प्रदूषणाकडेही बघितले पाहिजे हे आता काळाची गरज आहे, हवेतील प्रदूषण आवाजाचे प्रदूषण ही आता होत आहे आणि ते दिसत आहे, मागील काही काळामध्ये डीजे पासून होणाऱ्या परिणामांची जाणीव जनतेला होत आहे हे आपण जाणलेले असतानाच आता फटाक्यांच्या आवाजापासून फटाक्यांच्या धुरापासून आणि उंच उंच उडणाऱ्या फटाक्यांपासून वातावरणात होणारे प्रदूषण कमी करता येईल काय याकडे समाजाने आता बघण्याची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये साजरे होणारे सण आनंदाने साजरे करतानाच प्रदूषण रोखता येईल काय याकडे बघणे आता गरज आहे.
फटाक्यांपासून मिळणारा आनंद कमी न करता फटाक्यांपासून होणाऱ्या प्रदूषणासाठी शोध ही गरज आहे आणि त्यासाठी संशोधन होणे गरजेचे असून फटाक्यांपासून प्रदूषण कशी रोखता येईल याकडे आपला आता कल होऊ घातलेला पाहिजे.




