pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या कुंभारझरीच्या पंढरपूर दिंडीचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कडून प्रथमच शिस्तीचे निरीक्षण

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या कुंभारझरी येथील वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने निघणाऱ्या स्वग्राम कुंभारझरी ते पंढरपूर या पायी दिंडीचे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानतर्फे कौतुक करण्यात आले. या दिंडीला देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने मंगळवारी पाष्टा (जि. धाराशिव) या ठिकाणी भेट देऊन दिंडीचे निरीक्षण केले. या विश्वस्त मंडळात शिवाजी महाराज मोरे, प्रकाश महाराज जंजाळ, माधवी निगडे आदींचा समावेश होता. १२वर्षांपासून स्वग्राम ते पंढरपूर ही पायी दिंडी निघते. यावेळी दिंडीतील महिला व पुरुषांचा गणवेश, शिस्तबद्ध प्रवास, अभंग गायन, कीर्तन सेवा, पर्यावरणपूरक कार्य, प्लास्टिक निर्मूलन आदी सेवा पाहून विश्वस्त मंडळ भारावून गेले. दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांपैकी तीन आदर्श दिंड्यांना पंढरपूर देवस्थानतर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष बक्षीस दरम्यान, जालना जिल्ह्यातील देऊन गौरविले जाते. स्वग्राम ते पंढरपूर या दिंडीचे प्रथमच या पुरस्कारासाठी निरीक्षण केले गेल्याने वारकऱ्याच्या उत्साहाला उधाण आले आहे. यावेळी विश्वस्त मंडळातील सर्व सदस्यांचा दिंडीचे प्रमुख सोनुने गुरुजी यांच्या उपस्थितीत हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडीतील वारकरी शालिकराम म्हस्के, भगवान महाराज गायकवाड, भगवान चव्हाण, सुनील वायाळ, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे आदींसह वारकरी महिला व पुरुषांची उपस्थिती होती. कुंभारझरी येथील ह.भ.प. सोनुने गुरुजी यांच्या पुढाकाराने मागील बारा वर्षापासून स्वग्राम ते पंढरपूर ही पायी दिंडी निघते. या दिंडीत सहभागी वारकऱ्यांना विशेष गणवेशात यावे लागते. पुरुष वारकऱ्यांना पांढरा ड्रेस, टोपी तर महिला वारकऱ्यांना केसरी साडी असा ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. __________________________________________

जाफराबाद तालुक्याच्या टेंभुर्णी परिसरातील सोनवणे महाराज यांच्या दिंडीचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कडून निरीक्षण करून कौतुक करण्यात आले. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझडींच्या या दिंडीचे वारकरी संप्रदाय उत्कृष्ट दिंडी म्हणून जेव्हा गौरवण्यात येते तेव्हा जाफराबाद तालुक्याचा अभिमान असा हा क्षण आहे. जाफराबाद तालुका भक्तिमय मार्गामध्ये पुढारलेला आहे. विविध धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रामध्ये जाफराबाद तालुका मागे नाही. तसेच वारकरी संप्रदाय महाराष्ट्र मध्येच नव्हे तर देशांमध्ये जगामध्ये सुद्धा या संप्रदायाला मान आहे. या संप्रदायाच्या दिंडीचा कौतुक सोहळा होतो आहे. विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे विश्वस्तांनी निरीक्षण केले म्हणजेच पुरस्कार मिळाल्यासारखंच आहे. तो आमच्या टेंभुर्णी जवळ कुंभार जरीचा मान नसून संपूर्ण जाफराबाद तालुक्याचा मान आहे. ……….ह. भ. प. रघुराम कोरडे महाराज टेंभुर्णीकर तालुका जाफराबाद जिल्हा जालना..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे