जाफराबाद टेंभुर्णी देऊळगाव राजा रस्ता, अपघाताची संख्या वाढत आहे, उपाय योजना करणे गरजेचे आहे

टेंभुर्णी /दत्ता देशमुख,दि.17
जाफ्राबाद तालुक्यातून जालना जाणाऱ्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात आहे. जीवनातील सर्वच गरजा पाहता जालना येथे शासकीय राजकीय शैक्षणिक काम सोबत दवाखाना रोड कचेरी असो यासाठी जाणे क्रमप्राप्त झाले आहे.साहजिकच जाणे येणे हे स्वतःच्या मोटार सायकल किंवा चार चाकी ने जाणे वाढले आहे.या सर्व धावपळीत आणि घाई गडबड मुळे अपघाताचे प्रमाण इतके वाढले आहे की जीवन सोपे झाल्यासारखे वाटत आहे. यात वाहन चालवताना घेतल्या गेलेल्या काळजी बाबत चालकांची जरी उदासीनता दिसून येत आहे.यात वाहन ची कंडीशन आणि चालवताना व्यसन या बाबत थोडी काळजी घेण्याची गरज वाढली आहे. जाफ्राबाद हून येतांनी रोड ची कंडीशन चांगली झाली असल्यामुळे वाहनाचे वेळ ही वाढला आहे.सोबत पूर्णा च्या अलीकडे ते टेंभुर्णी पर्यंत अपघात स्थळ हा कायमचा असून तिथे होणाऱ्या अपघाताची संख्या मोठी वाढलेली असल्याचे दिसत आहे.त्या मध्ये पूर्णा नदीच्या अलीकडे खामखेड फाटा, नवीन सुरू झालेल्या कलावती पोतदार शाळे समोरील धोकेदायक मोठे वळण समोर दर्गा जवळील स्पॉट पुढे नवीन झालेले वॉटर पार्क, त्या पुढे गौरी आश्रम मठाजवळ जागा,या समोर असलेल्या मठा च्या आणि सावंगी ते गोधनखेडा फाटा पर्यंत ची जागा ते समोर हॉटेल गारवा आणि त्या पुढे असलेल्या अर्दक चा कारखाना व त्या जवळील पाटाचे असलेली चारी चे ठिकाण सोबत पुढे असलेल्या पेट्रोल पंप ते जिजाऊ शाळा आणि पुढे असलेले भातोडी गावाकडे जाणारे धोकेदायक वळण ते समोर असलेल्या हॉटेल जंजिरा सोबत नाव भारत शिक्षण संस्था कडे जाणारा तो चौक सोबत पुढे कुंभारझरी फाटा आणि शिवाजी नगर येथील रहदारीच्या ठिकाण सह सगळ्या दिवसेंदिवस धोकादायक जागा आणि तिथे वाढत असल्या घटना या मुळे मोठी चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे या सगळ्या जागेच्या स्पॉट मधील अंतर फक्त सात किलोमीटर असून येथे जवळपास दहा स्पॉट धोकादायक झाले आहे. या मध्ये रोड वरील दिशा फलक त्या वर न लावलेल्या अपघात स्थळ स्थान चे फलक रोड वरील स्पीड ब्रेकर अश्या अनेक सुचलेल्या पण ला लावलेल्या सूचना मुळे हे अपघात अजून किती दिवस पाहणे हेच समजत नाही. होणाऱ्या अपघात मध्ये होणारी हानी ही फक्त त्या कुटुंबाला विचार की किती जड चालू आहे त्यांची जीवन चर्चा किती परेशानी झेलून ते जगत आहे.हे फक्त त्यांनाच माहीत कारण शासनाची चूक बांधकाम विभाग ची चूक आणि सजा भेटती त्या कुटुंबाला अशी अवस्था झाली असुन हे असे किती दिवस चालू देणे हा मूळ प्रश्न निर्माण झाला आहे. सूचना आणि गरज झालेले रोड जरी चांगले झाले असेल असे त्यांना वाटत असेल तरी त्यांच्या दर्जा रोड करता वेळी न घेतलेली काळजी सोबत रोड वरील दिशा फलक सूचना फलक आणि योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर ची गरज आणि वळण वर योग्य दिशा बान आणि अंदाजे अपघात स्थळ वर सूचना फलक लावण्याची गरज आणि वाहन धारकांनी ही गाडी चालवताना विनाकारण ओव्हर टेक करणे स्पीड ने गाडी न चालविणे सोबत गाडी चालविता वेळी नशा न करणे आपल्या वाहनाची कंडीशन चांगली ठेवणे काळाची गरज झाली आहे. पूर्णा नदीच्या अलीकडे ते टेंभुर्णी या सात किलोमीटरच्या अंतर मध्ये जवळपास 12 ठिकाण अपघात स्पॉट म्हणून निर्माण झाले असून कोणतेही वाकण नसलेल्या ठिकाणी ही होत असलेल्या अपघात मध्ये अनेकांचे जीव गेल्याची खराब इतिहास असून या बाबत काळजी घेण्याची गरज वाढली आहे. सोबत टेंभुर्णी हून जालना कडे जाणाऱ्या रोड चे ही असेच हाल असून या सर्व अंतर मध्ये व देऊळगाव राजा बाय पास येथे होणाऱ्या अपघाताची संख्या कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे या बाय पास च्या अपघाताची संख्या कमी होण्यासाठी या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार संतोष दानवे व सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांनी विधान सभेत हा प्रश्न गाजविला होता. मात्र शून्य प्रतिसाद भेटल्याचे वर्त असून ते सत्तेतील आमदार असून त्यांनी केलेल्या कामाला यश येत नाही या बाबत त्यांची सुद्धा उदासीनता दिसून आली आहे असेच म्हणावे लागेल. कारण सध्या नुसते रोड करून चालणार नसून त्या पाठीमागे अजून काही सुधारणा दुरुस्ती करण्याची गरज वाढली असून विशेष म्हणजे अपघाताचे सत्र इतके वाढले आहे की यांची चिंता जगाला लागली आहे. अपघात झाल्यावर सुधारण करून होणार नसून सुधारणा त्वरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रतिक्रिया. १)संजय लहाने. सेवानिवृत शिक्षक. अपघाताची बातमी आणि त्यात झालेली मनुष्य हानी ने मन सुन्न होऊन जाते. रोड चांगले जरी झाले तरी दुरुस्ती अजून पाहिजे.रोड वरील दिशा फलक,वाढलेली झाडे, आवश्यक तिथे गतिरोधक सह वाहन चालकांनी ही वाहन हळू चालविल्यास अपघात कमी होतील मात्र वाढते अपघात ही चिंतेची बाब. २)विशाल वाकडे. सामाजिक कार्यकर्ता. आम्ही अपघात झाले की बातमी घेण्यास जातो त्यांचे लाइव्ह करतो मात्र आमचे मन ही आता हळ हळ करत आहे.कारण अपघाताचे प्रमाण खूप वाढले असून त्यात होणाऱ्या हानी ही मोठ्या होत आहे. शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यात लक्ष्य देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. ३)दीपक जमधडे.सामाजिक कार्यकर्ता. होणारे अपघात पाहून खूप वेदना होत आहे. या साठी सर्वच उपाय योजना ची गरज वाढली असून रोड वरती स्पीड ब्रेकर सोबत दिशा फलक रोड मध्ये दुभाजक अश्या अनेक बाबी सरकार ने अमलात आणून होणारे अपघात कमी होण्यासाठी लक्ष्य देण्याची गरज आहे.




