pub-7425537887339079
ब्रेकिंग

मराठवाडा शिक्षक संघ समन्वय समितीने दि.२१ एप्रिल रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सक्रिय सहभागी होणार

मराठवाडा शिक्षक संघाची केंद्रीय कार्यकारणीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0 4 1 1 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.6

गेल्या दिर्घकाळापासून प्रलंबित आसणाऱ्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांसाठी राज्यसरकारी कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपात मराठवाडा शिक्षक संघ सक्रिय सहभागी होणार आसल्याचा निर्णय संघटनेच्या आज रविवार दि.५ रोजी परळी येथील शिक्षक भवन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
याबाबत केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी दिलेली सविस्तर माहिती असी की, मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक आज रविवार दि.५ एप्रिल रोजी येथील शिक्षक भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या वेळी संघटनेचे सरचिटणीस राजकुमार कदम सर यांनी २१ एप्रिल रोजी समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होण्यासाठी काय निर्णय घ्यायचा असा विषय मांडला आसता बैठकीस उपस्थित आसलेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संपात सक्रिय सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेतला.
राज्यसरकारने मान्य केलेली “सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करावी!,कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात,सेवानिवृत्त वय ६० वर्षे करावे, शिक्षकांना १०,२०,३० या तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी,१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, निकषपात्र विनाअनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.ज्ञानोबा वरवट्टे हे होते तर यावेळी व्यासपीठावर संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान मार्गदर्शक पी.एस. घाडगे, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए.बी. औताडे, सहसचिव टी.जी.पवार आदिजन उपस्थित होते.
यावेळी बैठकीत शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.संघटनेने वर्षभरात केलेल्या विविध कार्याचा लेखाजोखा सरचिटणीस राजकुमार कदम यांनी मांडला.
बैठकीची सुरुवात संघटनेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य अशोक मस्कले यांचे वडील स्व.विठ्ठलराव पुंडाप्पा मस्कले, नांदेड जिल्ह्याचे माजी सचिव विजय खुणेवाड यांचे वडील स्व.गंगाराम खुणेवाड तसेच प्रा.मारोती तेगंमपुरे यांचे वडील स्व.विरभद्र हनुमंत तेगंमपुरे यांचे निधन झाल्याने या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
बैठकीला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील केंद्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे मार्गदर्शक पी.एस.घाडगे, टी.जी.पवार, राजकुमार कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीचे अध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे यांच्या भाषणाने समारोप झाला.
शेवटी आभार धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेरखाने यांनी मानले.
बैठक व्यवस्थित पार पाडण्यासाठी केंद्रीय कार्यकारणी सदस्य अशोक मस्कले, बंडू अघाव, शेळके, भोसले यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे