pub-7425537887339079
ब्रेकिंग

देळेगव्हाण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडत झाली जाहीर

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतील चारही वाडांतील सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पडली. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार वार्ड क्र. १ मध्ये एक जागा अनुसूचित जाती महिला, एक जागा सर्वसाधारण व एक जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. वार्ड क्र. २ मध्ये एक जागा सर्वसाधारण महिला, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित करण्यात आली आहे. वार्ड क्र. ३ मध्ये एक जागा मागास प्रवर्ग महिला, एक जागा अनुसूचित जाती महिला व एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. वार्ड क्र. ४ मध्ये एक जागा सर्वसाधारण, एक जागा सर्वसाधारण महिला आणि एक जागा एससी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर संभाव्य इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून मतदारांशी संपर्क वाढविण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही आरक्षण प्रक्रिया उपतालुका कृषी अधिकारी रणजित राजपूत, ग्राम महसूल अधिकारी एन. एच. पठाण आणि ग्राम विकास अधिकारी एस. बी. शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली 1

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे