pub-7425537887339079
ब्रेकिंग

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वीरांना जामखेडमध्ये अभिवादन

आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्तीपूर्ण वातावरणात मुक्ती संग्राम दिन साजरा; विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे

0 5 3 0 8 2
[sp_wpcarousel id="1375"]

अंबड/प्रतिनिधी,दि.17

अंबड तालुक्यातील जामखेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या निमित्ताने आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, जामखेड येथे सकाळी ७.४० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रमुख नेते स्वामी रामानंद तीर्थ आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी सोनाजी बापू खंडागळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. गंगाधरजी पांढरे, संचालिका आशाताई पांढरे, उपमुख्याध्यापक निखिल पाटील, व्यवस्थापक गोकुळ नेमाने, डॉ. देव पांढरे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.

यानंतर लोकमतचे पत्रकार सोनाजी खंडागळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि त्यांच्या त्यागाचे महत्त्व यावर प्रभावी भाषणे केली. विद्यार्थ्यांच्या भाषणातून स्वातंत्र्य, देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देण्यात आला.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मृतींना उजाळा देत कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची जाणीव झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 0 8 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे