pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णीच्या साळवे कुटुंबाचे, सगळ्यात मोठे धोंडे जेवण

0 4 4 2 0 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.9

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील साळवे कुटुंब. सध्या अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाचा कार्यक्रमाची आयोजन करण्यात येत असते. धोंडे जेवण म्हणजे अधिक मासानिमित्त जावयाला देण्यात येणारे गोडधोडाचे जेवण. आता काय बदललेला आहे काळा बरोबर जगलं पाहिजे या भावनेतून टेंभुर्णीच्या साळवे कुटुंबाने आपल्या जावया बरोबरच आपल्या मावस जावयांना तसेच नातेवाईकांच्या जावयांना भावांच्या जावा जावयांना, मित्रमंडळींना, तसेच मुलांच्या मित्रमंडळींना, असा सगळा मोठा धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या धोंडे जेवणाला सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावण्याचे आग्रहाचे निमंत्रण आपल्या तर्फे देण्यात आले होते. त्यांच्या या सहकुटुंब सहपरिवाराच्या मोठे धोंडे जेवण म्हणजेच अधिक मासानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला. अधिक मासानिमित्त पुण्यपूर्वकाल सुरू असतो. पूर्वपुण्य काळामध्ये धोंडे जेवण एक आनंदाचे वातावरण निर्माण करते. त्याच भावनेतून यासाठी केला होता अट्टाहास अशा आशयाचे वर्णन ज्याचे करता येईल असे हे धोंडे जेवण परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. धोंडे जेवणाला विशेष उपस्थिती म्हणजे मानव सेवा मंडळाची उपस्थिती होती. त्यांचे तर्फे साळवे कुटुंबांना मोठे गिफ्ट सुद्धा देण्यात आले. अरे कुटुंबातर्फे येणाऱ्या प्रत्येकाला टॉवेल टोपीचा आहेर सुद्धा करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 2 0 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे